पाच हजाराची लाच घेताना वाहतूक शाखेचा शिपाई अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:25 PM2019-01-19T18:25:30+5:302019-01-19T18:27:17+5:30
अकोला : तेल्हारा येथील आनंद मेळाव्याचे वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली.

प्रकाश जाधव असे आरोपी पोलिसाचे नाव असून, तो तेल्हारा येथे वाहतूक शाखेत कार्यरत होता.
तेल्हारा शहरातील बस स्थानकच्या बाजूला असलेल्या परिसरात आनंद मेळा तसेच स्वयंरोजगार प्रर्दशनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. मेळावा ६ जानेवारी रोजी संपला होता. या मेळाव्यावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वाहतूक पोलीस प्रकाश जाधव याने पाच हजाराची मागणी आयोजकांकडे केली होती. अकोट येथील आयोजकांना ही रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून शनिवारी दुपारी चार वाजता एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाचेची रक्कम घेत असताना वाहतूक पोलीस जाधव याला रंगेहाथ पकडले. या कारवाईत सदर वाहतूक पोलीस अडकल्याने तेल्हारा पोलिसांचे धाबे दणाणले आहे. कारवाई पोलीस अधीक्षक धिवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोहेकॉं दामोदर,पोलीस नाईक अनवर खान यांनी केली.