कुजबुज : मिटकरींचे ट्विट झाेंबलं, भाजपचे नाव घेताच बाेंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:41+5:302021-07-19T04:13:41+5:30
........................... ट्विट मत अमितजी शहांकडे सहकार खाते गेल्यानंतर हालचाली निश्चित वाढणार आहेत..! रणधिर सावरकर आमदार, अकाेला पूर्व .................... काॅंग्रेसचे ...
...........................
ट्विट मत
अमितजी शहांकडे सहकार खाते गेल्यानंतर हालचाली निश्चित वाढणार आहेत..!
रणधिर सावरकर आमदार, अकाेला पूर्व
....................
काॅंग्रेसचे कार्यकर्ते भांडले...पण बाेलले काेणासाठी?
काॅंग्रेसच्या बैठकीतील बाचाबाची अन् हातघाई सध्या काॅंग्रेसच्या राजकारणात चांगलीच गाजत आहे. तसं पाहिलं तर अकाेल्यातील काॅंग्रेस फक्त बैठकांपुरतीची उरली असून, आता बैठकातही असे हाणामारीचे प्रकार हाेत असतील तर मग पक्षाच्या बैठकाही हाेतील की नाही? इतपत शंका व्यक्त केली जात आहे. आता हे सारे महाभारत तुम्हाला माहीत आहेच, पण तरीही सांगीतले कारण सध्या काॅंग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे पुन्हा सुरू झाले. पुन्हा म्हणजे गेल्या चार वर्षांपासून ते सुरूच आहेत. कधी कधी वेगाने वाहतात अन् मग एकदम बंद हाेतात...मग कायर्कर्ते घामाघूम...तर वारे पुन्हा सुरू झाल्यावर पहिलीच बैठक हाेती ती सुद्धा निरीक्षकांसमाेर..निरक्षकच भाई ( नगराळे ) हाेते, मग काय दाेन कार्यकर्त्यांनी भाईगिरी सुरू केली अन् पक्ष कसा निट चालत नाही याची पिपाणी एकाने वाजवल्याबराेबर दुसरा विराेधात सुरू झाला...पुढे काय महाभारत झाले हे माहीत आहेच...आता चर्चा सुरू झाली ती म्हणजे हे कार्यकर्ते स्वत:हून बाेलले की काेणी बाेलायला अन् भांडायलाही लावले...बर स्व:ताहून बाेलले असतील तर पक्षाची काळजी समजता येईल, किमान त्याची तरी दखल नेतृत्वाने घेतली पाहिजे, अन् कुणाच्या सांगण्यावरून बाेलले असतील, तर मग पक्षात गटबाजी आहे हे मान्यच करावे लागेल...आता ताे गट काेणाचा? ज्याला गरज आहे त्याने शाेध घ्यावा...सध्या तरी काॅंग्रेसचे कार्यकर्ते भांडले...पण बाेलले काेणासाठी? याच प्रश्नाने अनेकांचे डाेके गरम झाले आहे.
........................
शांतता...भाजपाचा अभ्यास सुरू आहे
काेराेनाच्या काळात राजकीय पक्षांनाही आपल्या कार्यशैली बदलाव्या लागल्या, बैठकांची गर्दी कमी झाली, सभाही बंद झाल्या पण ऑनलाइन मिटिंग मात्र जाेरात सुरू झाल्या आहेत. सध्या भारतीय जनता पक्ष या ऑनलाइन बैठकांमध्ये सगळ्यात पुढे आहे. भाजपाच्या काेणत्या न काेणत्या तरी कक्षाची राेज एक बैठक असते नाहीतर अभ्यास वर्ग असताेच...आता जिल्हा परिषद निवडणुकाही रद्द झाल्यात, पक्षही सत्तेत नाही त्यामुळे भाजपतील सगळे बुद्धिवंत सध्या अभ्यासाचे डाेस कार्यकर्त्यांना पाजत आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते अभ्यासत झुम करत आहेत..काही तर बहाद्दर ऑनलाइन कनेक्ट हाेतात अन् हजेरी लावून बाकीचे काम करत राहतात..आता एवढं चालायचचं की राव...बैठकांमध्येही अनेक झाेपतातची की...पण झाेप असाे की ऑनलाइन अभ्यास म्हटलं की शांतता हवी...त्यामुळेच सध्या भाजप शांत आहे.
’......................................