व-हाडात पांढ-या सोन्याची पिछेहाट!

By admin | Published: July 19, 2016 12:31 AM2016-07-19T00:31:23+5:302016-07-19T00:31:23+5:30

कडधान्याच्या क्षेत्रात भर झाली असून खरीप हंगामात दोन लाख हेक्टरची घट झाली आहे.

White-white gold ebb! | व-हाडात पांढ-या सोन्याची पिछेहाट!

व-हाडात पांढ-या सोन्याची पिछेहाट!

Next

अकोला : कधीकाळी पश्‍चिम विदर्भाचे (वर्‍हाड)पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस या नगदी पिकाला ओहोटी लागली असून, यावर्षीच्या खरीप हंगामात हे क्षेत्र दोन लाख हेक्टरने कमी झाले आहे. कडधान्याच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली असून, तूर ७७ तर उडिदाचे क्षेत्र १0 हजार हेक्टरने वाढले आहे. सोयाबीनने तर यावर्षी १३ लाख ७६ हजार हेक्टरपर्यंत उच्चांकीचा आकडा गाठला आहे. दरम्यान, यावर्षी सतत पाऊस सुरू असल्याने युरिया खताच्या मागणीत वाढ झाली आहे.
वर्‍हाडात ३२ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाचे असून, आतापर्यंत ९३ टक्के म्हणजेच ३0 लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.पाऊस वेळेवर व पूरक झाल्याने शेतकर्‍यांनी यावर्षी सोयाबीनची विक्रमी म्हणजेच आतापर्यंत १३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. तसे बघितल्यास सोयाबीनचे या भागातील सरासरी क्षेत्र हे १२ लाख ६८ हजार आहे, तर या भागाची ओळख असलेल्या पांढर्‍या सोन्याची मात्र दरवर्षी पिछेहाट सुरू असून, यावर्षी तर हे क्षेत्र २ लाख २७ हजार हेक्टरने कमी झाले आहे. यावर्षी सरासरी १0 लाख ८७ लाख हेक्टर हवे होते ते क्षेत्र आजमितीस ८.६0 लाख हेक्टरच आहे.
कडधान्याचे क्षेत्र मात्र वाढले असूून, तुरीचे क्षेत्र या भागात ४ लाख हेक्टर होते, यामध्ये ७७ हजाराची वाढ झाली आहे. उडीद ८६ हजार क्षेत्र आहे. यावर्षी ९६ हजार हेक्टरवर पेरणी झाली.


४७ हजार मेट्रिक टन युरिया
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिके पिवळी पडल्याने युरियाची मागणी वाढली असून, ४७ हजार मेट्रिक टन निमकोटेड युरियाचा साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
 

Web Title: White-white gold ebb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.