देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे मनोरुग्णच- राजन खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 06:53 PM2018-10-28T18:53:49+5:302018-10-28T18:53:57+5:30
अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी सोडले.
अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी सोडले.
बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने प्रमिलाताई ओक सभागृह येथे आयोजित नवरात्र व्याख्यानमालेतील आठवे पुष्प गुंफ ताना शनिवारी वक्ता म्हणून राजन खान ‘माणूस म्हणून जगणं’ या विषयावर बोलत होते. राजन खान पुढे म्हणाले की, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जीवन जगताना पाच रू पडी आपल्यासमोर सातत्याने येत असतात. हे रू पडी म्हणजे जात, धर्म, देव (परमेश्वर), लिंगभेद आणि सर्व प्रकारचा भ्रष्टाचार. यापुढील पारदर्शी, प्रामाणिक असा नवा समाज उदयाला आला पाहिजे, असे वाटत असेल तर पाच रू पडे सोडले पाहिजे.
आपल्याकडील साहित्यदेखील जाती-धर्माने ओळखले जाते. साहित्य लेखकाच्या नावा-आडनावावरू न तो लेखक कोणत्या प्रकारचा साहित्यिक आहे, हे ओळखल्या जाते, ही दुर्दैवाची बाब आहे. साहित्य हे साहित्य असते, त्याला कोणतीही जात नसते. त्याचा कोणताही धर्म नसतो, असेही खान म्हणाले. समाजासाठी झटणाऱ्या लोकांना आपल्याच समाजतील लोक जगू देत नाहीत. समाजासाठी लढणाºया ध्येयवेड्या लोकांना जगू दिले पाहिजे. समाजाच्या शांतीसाठी झटणारी ही माणसे आहेत. जाती-धर्माच्या संघर्षातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे, आज आपण माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पोलीस घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये, असा समाज आज अपेक्षित आहे, असे विचार खान यांनी व्यक्त केले.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात घरातील संवाद हरविले आहेत. घरात गप्पा करणे हा प्रकार कोठेच दिसत नाही. स्पर्शाची भाषा संपली आहे. दोन माणसांमधील नाती नष्ट झाली आहेत. मुखवटे घेऊन समाजात व्यक्ती वावरताना दिसतात. कौटूंबिक आणि समाजिक पातळीवर जेव्हा दोन व्यक्ती भेटतात, तेव्हा आपण आपली प्रतिमा समोर पाठवित असतो. संवाद प्रतिमांशी होतो, माणसांशी होत नाही. हे खोटे जगण्याचे मुखवटे जेव्हा काढल्या जातील, तेव्हाच माणूस शांतीने आणि सुखा- समाधानाने जगू शकेल, असे खान यांनी सांगितले.