अकोल्यात चंद्र कोणी आणला? शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!

By Atul.jaiswal | Published: September 10, 2023 01:32 PM2023-09-10T13:32:36+5:302023-09-10T13:32:50+5:30

अकोल्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक बेहाल आहेत.

Who brought the moon to Akola? On the bad condition of the roads in the city Adv. Prakash Ambedkar's tweet! | अकोल्यात चंद्र कोणी आणला? शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!

अकोल्यात चंद्र कोणी आणला? शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!

googlenewsNext

अकोला : अकोला शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर खोचक भाष्य करणारे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. गेले काही वर्ष स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. 

त्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी सभागृहात लोकप्रतिनिधी नाहीत. भाजप - शिंदे सेनेचे सरकार प्रशासकाच्या माध्यमातून कारभार हाकत आहे. जनतेचे अनेक प्रश्न असेच प्रलंबित आहेत. त्यातच अकोल्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक बेहाल आहेत.

अकोला शहरातील खराब रस्त्यांचे फोटो ट्विट करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, "आश्चर्यचकित होऊ नका. हा चांद्रयान ३ द्वारे काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो नसून अकोल्यातील रस्त्यांचा फोटो आहे. आता अकोल्यात चंद्र आणण्यासाठी कोण जबाबदार आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे!" असे खोचक भाष्य केले आहे.

Web Title: Who brought the moon to Akola? On the bad condition of the roads in the city Adv. Prakash Ambedkar's tweet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला