जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही होलसेल किराणा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:21 AM2020-03-25T11:21:30+5:302020-03-25T11:21:43+5:30

किराणा बाजार व शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

Wholesale grocery market closed despite no orders from collectors | जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही होलसेल किराणा बाजार बंद

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही होलसेल किराणा बाजार बंद

Next

अकोला : राज्य सरकारने २३ मार्च रोजी जाहीर केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून औषधी, किराणा व्यावसायिकांना व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत. यादरम्यान, शहरातील होलसेल किराणा बाजार असो वा घाऊक किराणा दुकानांना बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांचा कोणताही आदेश नसताना मंगळवारी राष्ट्रीय महामार्गालगतचा होलसेल किराणा बाजार व शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
देशासह राज्यात संसर्गजन्य कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी सातत्याने आवाहन केले जात आहे. सरकारच्या आवाहनाला काही नागरिक जुमानत नसल्याचे पाहून अखेर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व त्यांची चमू रात्रंदिवस या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत सामील असलेल्या किराणा व औषधी व्यावसायिकांना व्यवसाय सुरू ठेवण्याचे राज्य शासन व जिल्हाधिकाºयांचे स्पष्ट निर्देश असताना शहरातील होलसेल किराणा मर्चंट असोसिएशन व मध्यवर्ती भागातील घाऊक किराणा व्यावसायिकांनी त्यांची बाजारपेठ बंद ठेवल्याचा प्रकार समोर आला. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी होलसेल किराणा मार्केट बंद ठेवल्याची बाब उजेडात आली आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने दखल घेतली आहे.


औषधी विके्रत्यांना धास्ती का नाही?
संचारबंदी लागू झाल्यानंतरही शहरातील औषधी व्यावसायिकांची दुकाने उघडी आहेत. मंगळवारी सकाळी काही औषधी दुकानातील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर दवा बाजारच्या संचालकांनी व औषधी व्यावसायिकांनी यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढला. तसा प्रयत्न होलसेल किराणा मर्चंट असोसिएशनने का केला नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

जुने शहरात पुरवठा ठप्प
जुने शहरातील बहुतांश किराणा व्यावसायिकांना मध्यवर्ती बाजारपेठेतील रिटेल व घाऊक किराणा बाजारातून अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना संबंधित व्यापाºयांनी हात आखडता घेतल्याची धक्कादायक माहिती आहे. यामुळे पुढील आठ दिवसांत जुने शहरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी तसेच जिल्हापुरवठा अधिकाºयांनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

जिल्हा असो वा शहरातील किराणा मार्केट, औषधी व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी होलसेल किराणा मार्केट बंद ठेवण्याची बाब पटण्यासारखी नाही. शहरात अन्नधान्य, औषधी व जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यास संबंधितांची खैर नाही.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी


संचारबंदीमुळे शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. कारवाईच्या भितीपोटी व्यापारी दुकाने उघडण्यास धजावत नसल्याची परिस्थिती आहे. किराणा बाजार सुरु करण्यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाºयांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
-कासम अली नानजी भाई, अध्यक्ष होलसेल किराणा मर्चंट असोसिएशन

 

Web Title: Wholesale grocery market closed despite no orders from collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.