होलसेल किराणा बाजारात गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:14 AM2021-06-22T04:14:09+5:302021-06-22T04:14:09+5:30
रेल्वे पुलाचे काम थंड बस्त्यात अकोला : अकोल्यावरून डाबकी रोड गायगावकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे पुलाचे बांधकाम थंड बस्त्यात आहे. ...
रेल्वे पुलाचे काम थंड बस्त्यात
अकोला : अकोल्यावरून डाबकी रोड गायगावकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे पुलाचे बांधकाम थंड बस्त्यात आहे. एक वर्षापासून या पुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहे.
जिजाऊ नगरमधील झाड कोसळले
अकोला : कौलखेड तुकाराम चौक रिंग रोडवरील जिजाऊ नगरमध्ये वडाचे झाड कोसळल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या परिसरात वडाचे दोन झाड असून, त्यामध्ये एक झाड बाजूच्या खाली मैदानात उन्मळून पडले आहे.
हॉस्पिटल समोर वाहनांची गर्दी
अकोला : सिव्हिल लाईन्स चौकाकडून जवाहर नगरकडे जाणाऱ्या रोडवर तीन ते चार हॉस्पिटलसमोर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या हॉस्पिटल संचालकांना समज देऊन रस्त्यावरील वाहने वाहनतळ, तसेच शिस्तीत लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.