फाटले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:45 AM2017-09-28T01:45:55+5:302017-09-28T01:46:09+5:30
अकोला : ‘फाटले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती’ या काव्यपंक्तीप्रमाणे वंचितांची दिवाळी साजरी व्हावी, या हेतूने अकोल्यातील एक ध्येयवेडा ११ वर्षांपासून झटतो आहे. घरात जमा होणारी रद्दी अगदी टाकून द्यायला नको म्हणून लोक ती रद्दीवाल्याकडे देतात आणि दोन-पाच रुपये घेतात. या रद्दीचाच सत्कार्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी ‘स्वराज’ या संघटनेच्या माध्यमातून पुरुषोत्तम शिंदे हे संकल्परत आहेत. वंचितांच्या आयुष्यातही दिवाळी साजरी व्हावी, यासाठी घरातील रद्दी या सत्कार्यासाठी देण्याचे आवाहन त्यांनी अकोलेकरांना केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

दिवाळी म्हटली, की आनंद, उस्ताह. हा आनंद प्रत्येक जण आ पापल्या परीने साजरा करीत असतो. मात्र, आपल्या आनंदात इ तरांनाही सहभागी करून घेण्यासाठी धडपडणारे ध्येयवेडे फारच थोडे. दिवाळीत संपूर्ण देश एका वेगळ्या आनंदात असताना समाजातील एक घटक मात्र या सर्व उत्साह, आनंदापासून कोसो दूर असतो.
अशाच वंचितांच्या जीवनात आनंद, उत्साह भरण्याचा प्रयत्न ‘स्वराज’ या संस्थेच्या माध्यमातून शिंदे करीत आहेत. नागरिकांकडून रद्दी गोळा करीत त्यातून मिळणार्या पैशातून वंचितांना दिवाळीत फराळ, कपडे देऊन त्यांच्या आयुष्यातही एका दिवसात दिवाळीच्या आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न शिंदे करीत आहेत. त्यांच्या या महान कार्याला नागरिकांचाही हातभार लागावा, यासाठी शिंदे यांनी नागरिकांना त्यांच्या घरातील रद्दी ‘स्वराज’ संस्थेकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.
येथे करा रद्दी जमा
- प्रभात किड्स, शासकीय दूध डेअरीजवळ च् हॉटेल सेंटर प्लाझा
- चिंतामणी मेडिकल, जठारपेठ च्अस्पायर इन्स्टिट्यूट, गोरक्षण रोड
- छाया मेडिकल, डाबकी रोड च्लोकमान्य वॉच कंपनी, टिळक रोड
- डॉ. तिरूख हॉस्पिटल, केडिया प्लॉटच् रेनबो हॉस्पिटल, रामदासपेठ
- रामश्याम ऑटोमोबाइल, मोठी उमरी