ट्रिपलसीट वाहनचालकांना आवरणार काेण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:24 AM2021-09-07T04:24:09+5:302021-09-07T04:24:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सचिन राऊत अकोला : जिल्ह्यात दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सचिन राऊत
अकोला : जिल्ह्यात दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जात असतानासुद्धा ट्रिपलसीट वाहनचालकांची धूम दिसून येत आहे. या वर्षात जानेवारीपासून ते आतापर्यंत एकूण १२ हजार ५२४ ट्रिपलसीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तरी सुद्धा ट्रिपलसीट वाहनचालक दिसूनच येत आहेत. या वाहनचालकांना काेण आवरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत १२ हजार ५२४ ट्रिपलसीट वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २४ लाख ३६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी दिली.
दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा
हेल्मेट घातल्यामुळे अपघातात अनेकांचे प्राण वाचले त्यामुळे हेल्मेट घाला
दुचाकीस्वारांनी झेब्रा क्रॉसिंगची शिस्त पाळावी
चालकाचे डाव्या बाजूकडे लक्ष कमी असते डाव्या बाजूने ओव्हरटेकिंग टाळा
वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणे टाळावे
पार्किंग नियमांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवावी
दारू पिऊन वाहन चालविणे टाळावे.
... असा झाला आहे दंड
विनाहेल्मेट ४ लाख १२१२३
परवाना नसणे ९ लाख ८९०००
नंबर प्लेट नसणे ५ लाख ३४५६४
वेगात वाहन चालविणे १२ लाख ९५०००
इतर कलमाखाली ११ लाख रुपये