दोन हेक्टरच्या अटीत १४ टक्के शेतकऱ्यांना वंचित का ठेवता? - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:38 PM2019-02-05T12:38:22+5:302019-02-05T12:38:29+5:30

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ टक्के शेतकºयांना दोन हेक्टरच्या अटीत अनुदानापासून वंचित का ठेवता, असा सवाल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.

Why deprive 14 percent of the farmers in the condition of two hectare? -kishor Tiwari | दोन हेक्टरच्या अटीत १४ टक्के शेतकऱ्यांना वंचित का ठेवता? - किशोर तिवारी  

दोन हेक्टरच्या अटीत १४ टक्के शेतकऱ्यांना वंचित का ठेवता? - किशोर तिवारी  

Next

- संतोष येलकर

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ टक्के शेतकºयांना दोन हेक्टरच्या अटीत अनुदानापासून वंचित का ठेवता, असा सवाल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेबु्रवारी रोजी संसेदत सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावादेखील सरकारकडून करण्यात आला. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या देशातील ८६ टक्के शेतकºयांना दरवर्षी ६ हजार रुपये नगदी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या देशातील १४ टक्के शेतकºयांना मात्र या नगदी अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे दोन हेक्टर शेतजमिनीच्या अटीत देशातील १४ टक्के शेतकºयांना दरवर्षी मिळणाºया ६ हजार रुपये अनुदानाच्या लाभापासून वंचित का ठेवता, असा सवाल करीत, शेतकºयांना नगदी अनुदानाचा लाभ देताना दोन हेक्टरची मर्यादा नसली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी केली.

अनुदानाची रक्कम दुप्पट करावी!
दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या देशातील शेतकºयांसाठी दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली; मात्र या अनुदानाची रक्कम दुप्पट करून, प्रती हेक्टर ६ हजार रुपये या प्रमाणे शेतकºयांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही तिवारी यांनी केली.

अनुदान एकरकमी शेतकºयांच्या खात्यात जमा करा!
आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांसाठी दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जाहीर केले; मात्र या अनुदानाची रक्कम तीन हप्त्यात शेतकºयांच्या खात्यात जमा न करता, अनुदान एकरकमी शेतकºयांच्या खात्यात जमा केले पाहिजे, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

Web Title: Why deprive 14 percent of the farmers in the condition of two hectare? -kishor Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.