फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:57+5:302021-09-03T04:19:57+5:30

सबसिडी किती मिळते हो भाऊ? गॅस सिलिंडरवर सुरुवातीपासून सबसिडी मिळत होती. यामुळे गोरगरिबांना सिलिंडर विकत घेणे परवडत होते. परंतु ...

Why even in a flat stove; Gas goes up by Rs 25 again | फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला!

फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला!

Next

सबसिडी किती मिळते हो भाऊ?

गॅस सिलिंडरवर सुरुवातीपासून सबसिडी मिळत होती. यामुळे गोरगरिबांना सिलिंडर विकत घेणे परवडत होते.

परंतु मे २०२० पासून सिलिंडरवर सबसिडी मिळणे बंद झाले आहे. काहीच जणांना ३-४ रुपये सबसिडी मिळते.

मात्र, कोरोना काळापासून सबसिडी बंद असली तरी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला वाढ सुरूच आहे.

शहरात चुली कशा पेटवायच्या?

महिन्याचे गणित कोलमडले!

गॅसचे भाव वाढत असल्याने सिलिंडरसाठीची जास्त रक्कम चुकवावी लागत आहे. यामध्ये सबसिडीही बंद झाली असून, फ्लॅटमध्ये राहत असल्याने चूल पेटविणेही शक्य नाही. तसेच शहरात चूल पेटवायची असल्यास जळतन विकत घ्यावे लागते. ते जळतनही महाग आहे.

- भावना इंगळे, गृहिणी

कोरोना काळात अनेक अडचणी समोर आल्या आहे. त्यातच किराणासोबत आता गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ होत आहे. पंधरा दिवसांत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. शहरात राहत असल्याने महागडे सिलिंडर घेतल्याशिवाय पर्याय नाही.

- राधा नाईक, गृहिणी

दर महिन्याला नवा उच्चांक

दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर

१ डिसेंबर १० ७०१

१ जानेवारी ३० ७३१

१ फेब्रुवारी २३ ७५४

१ मार्च १५ ७६९

१ एप्रिल १२ ७८१

१ मे ३१ ७९३

१ जून ०६ ८२४

१ जुलै २५ ८५५

१ ऑगस्ट २५ ८८०

१ सप्टेंबर २५ ९०५

व्यावसायिक सिलिंडरची महाग

दरवाढीचा परिणाम घरगुती सिलिंडरसोबत व्यावसायिक सिलिंडरवरही झाला आहे. आधी १६८२ रुपये ५० पैशांना मिळणाऱ्या सिलिंडरच्या दरात पंधरा दिवसांआधी ६ रुपये वाढ झाली होती, त्यामुळे ते १६८८ रुपये ५० पैशांना मिळत होते. आता तेही महागले आहेत.

Web Title: Why even in a flat stove; Gas goes up by Rs 25 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.