कन्या भ्रूणहत्येवर ‘ती एकाकी का?’ने दिली सणसणीत चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 02:32 PM2019-12-21T14:32:29+5:302019-12-21T14:32:39+5:30
तिला जन्मत:च सोडून जाणाºया आई-बापावर पुढे काय प्रसंग गुजरतो, याचे सुंदर आणि मन हेलावून टाकणारे चित्रण या नाटकातील बालकलावंतांनी केले.
अकोला: आम्हाला मुलगी नको, मुलगाच हवा, अशी मनीषा बाळगणाऱ्यांना आणि कन्या भ्रूणहत्या करणाºया समाजाला ‘ती एकाकी का?’ या बालनाट्याने सणसणीत चपराक लगावण्याचे काम केले. श्री समर्थ पब्लिक स्कूलने शुक्रवारी हे नाटक सादर करू न ‘मुलगी वाचवा’चा संदेश दिला.
आपल्याला मुलगाच हवा मुलगी नको, अशी इच्छा बाळगणाºया एका कुटुंबाच्या पदरी मुलगी पडते. त्यामुळे तिला जन्मत:च सोडून जाणाºया आई-बापावर पुढे काय प्रसंग गुजरतो, याचे सुंदर आणि मन हेलावून टाकणारे चित्रण या नाटकातील बालकलावंतांनी केले. यातील परीची भूमिका करणाºया संस्कृती सानप या बालिकेने अतिशय अप्रतिम अभिनय करू न प्रेक्षकांची दाद मिळविली. एखाद्या व्यावसायिक नाटकात मोठ्या कलावंताचा सहज अभिनय करावा, एवढा सहज अभिनय या नाटकातील चिमुकल्यांनी केला. उत्कृष्ट नेपथ्य, मांडणी, उत्कृष्ट प्रकाश योजना व संगीत या नाटकाच्या जमेच्या बाजू होत्या. प्रा. नितीन बाठे यांनी निर्मित केलेल्या व अनुप बाजड यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या नाटकाला मुख्याध्यापक रिता घोरपडे यांच्या मार्गदर्शन लाभले. नाटकात संस्कृती सानप, कोमल गाडे, ओम शनिवारे, कल्याणी गावंडे, श्लोक चव्हाण, अविनाश पोरे, भक्ती ठाकूर, आर्या राऊत, संस्कृती मोहोड, कल्याणी गावंडे, स्वरा कोरपे, सिद्धी खंडेझोड, ओम ठोंबरे, समृद्धी वाढे, नंदिनी खडसे, आकाश बनसोडे व ऋषिकेश अंधाळे या बालकलावंतानी उत्कृष्ट भूमिका वठविल्या.
शुक्रवारी स्पर्धेच्या तिसºया दिवशी एकूण आठ नाटके सादर करण्यात आली. यामध्ये ‘ती एकाकी का?’ या नाटकासह पंचनामा -ज्युबिली हायस्कूल, नळावरची झोंबाझोंबी -ब्ल्यु लोटस प्राथमिक शाळा, गाथा शेतकऱ्यांची- भारत विद्यालय, अंतराळ वेध- श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय अमरावती, अतिथी देवो भव- बालशिवाजी शाळा, पाणी बचाओ जीवन बचाओ- बालविकास कर्णबधिर शाळा व चवदार पाणी- जे आर डी टाटा स्कूल या नाटकांचा समावेश होता.
नाटकांचे सादरीकरण झाल्यानंतर स्पर्धेचे परीक्षक गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे यांनी बालनाट्य एकांकिका कशा सादर कराव्या व त्याची गुणवत्ता कशी वाढवावी, याबाबत मार्गदर्शन केले. सायंकाळी परीक्षक धनंजय सरदेशपांडे यांनी ‘खूपच टोचलंय’ ही एकांकिका सादर करू न प्रेक्षकांची मने जिंकली. उद्या, शनिवारी स्पर्धेचा समारोप असून, त्यापूर्वी ‘ये जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या विषयावर मनीष सेठी यांचे व्याख्यान होणार आहे.