काेणता झेंडा घेऊ हाती : पटाेले म्हणतात स्वबळावर, थाेरातांचा आघाडी धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:58+5:302021-08-23T04:21:58+5:30
राजेश शेगाेकार अकाेला : महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल असल्याचे तिन्ही पक्ष सातत्याने दाखवित असले तरी पक्षातील कुरबुरी सातत्याने ...
राजेश शेगाेकार
अकाेला : महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल असल्याचे तिन्ही पक्ष सातत्याने दाखवित असले तरी पक्षातील कुरबुरी सातत्याने बाहेर येतच असतात. परवा अकाेल्यात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशाेमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या असहकार्याचा हवाला देत आणखी एक खंत व्यक्त केली आहे. त्यामुळेच हे तीनही पक्ष किती दिवस साेबत नांदतील ही शंकाच असल्याने प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या पृष्ठभूमीवरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी अकाेल्यातच निवडणूक स्वबळावर असा नारा देऊन दंड थाेपटले हाेते. या नाऱ्याचा आवाज अजूनही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कानात घुमत असतानाच परवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष यांनी महाविकास आघाडीच कायम राहील, असे स्पष्ट संकेत अकाेल्यातच दिले .त्यामुळे आधीच संभ्रमीत असलेल्या काॅंग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था काेणता झेंडा घेऊ हाती अशी झाली आहे.
नाना पटाेले हे अकाेल्यात आले हाेते तेव्हा जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीचे पडघम वाजत हाेते. पटाेलेंच्या येण्यापूर्वी महाविकास आघाडी एकत्रीतपणे जि.प. पाेटनिवडणूक लढणार हे जवळपास निश्चीत झाले हाेते मात्र पटाेले यांनी स्वबळाचा नारा देऊन संभाव्य महाविकास आघाडीची हवाच काढून घेतली. त्यामुळे आघाडीसाठी झालेल्या पहिल्या बैठकीला नाममात्र हजेरी लावून काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सेना व राष्ट्रवादीसह प्रहारलाही दूर ठेवत एकला चलाेचा मार्ग अवलंबला व आपले उमेदवारही जाहिर केले. दूसरीकडे सेना राष्ट्रवादीने आघाडी करून उमेदवार दिले. दरम्यान ही निवडणुकची पुढे ढकल्यागेल्याने काॅंग्रेसच्या स्वबळाचे माेजमाप आकडयात हाेऊ शकले नाही. मात्र तेव्हापासून काॅंग्रेसचे कार्यकर्ते स्वबळाचीच भाषा बाेलू लागले आहेत. दाेनच दिवसापूर्वी नगरपालीका व नगरपंचयात निवडणुकीसाठी प्रभाग रचनांची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. एक सदस्यीय प्रभाग पध्दतीने नगर पालिका निवडणुका होणार असल्याची चर्चा असून त्यामुळे नगर पालिका क्षेत्रात वार्डनिहाय उमेदवार असले तर पक्ष चिन्ह घराघरात पोहोचणार, वार्डनिहाय बुथनुसार पक्ष कार्यकर्ते तयार होतील, पक्ष संघटन मजबूत होईल, अशावेळी स्वबळाचा नारा पक्ष संघटनेच्या वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त ठरण्याचीच चिन्हे आहेत. या पृष्ठभूमीवर आता ना. थाेरातांनी आघाडीचे दिलेले संकेत पाहता कार्यकर्त्यांच्या संभ्रम न वाढता तरच नवल. ना. थाेरात हे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, वजनदार मंत्री आहेत, कॅंबीनेट मंत्री यशाेमती ठाकूर अन माजी प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे अशा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी महाविकास आघाडीचे संकेत दिल्याने त्यांच्या विधानाकडेही कार्यकर्त्यांना कानाडाेळा करता येणार नाही, त्यामुळे काॅंग्रेसचे राजकारण काेणत्या दिशेला जाईल याचे अंदाज बांधण्यातच कार्यकर्त व्यस्त आहेत.