अकोला नाका परिसरातील चौकाची रुंदीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:09+5:302021-06-01T04:15:09+5:30
सांजा निपाणाचे तलाठी कार्यालय बंदच वणी रंभापूर : अकोला तालुक्यातील ग्राम वणी रंभापूरमधील सांजा निपाणा येथील तलाठी हे शेतकऱ्यांना ...
सांजा निपाणाचे तलाठी कार्यालय बंदच
वणी रंभापूर : अकोला तालुक्यातील ग्राम वणी रंभापूरमधील सांजा निपाणा येथील तलाठी हे शेतकऱ्यांना दिसलेच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कागदपत्रे कोठून घ्यावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शेतकरी यांना पीक कर्जासाठी तलाठ्यांकडून शेतीविषयक कागदपत्रे सदरच्या बँकेसाठी आवश्यक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सांजासाठी असलेल्या महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी हे शेतकऱ्यांना दिसलेच नाही.
रेशन दुकानांमध्ये खाद्यतेल उपलब्ध करण्याची मागणी
वरूर जऊळका: अकोट तालुक्यातील वरुर जऊळका, लोतखेड, खापरवाडी येथील नागरिकांनी रेशन दुकानांमध्ये खाद्यतेल उपलब्ध करून देण्याची मागणी पुरवठा विभागाकडे केली आहे. महागाईने उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत.
कृषी कायदा रद्द करण्याची मागणी
पातूर: केंद्र शासनाने तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी गुरुवारी काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदनातून केली आहे. यावेळी निवेदन देताना, तालुकाध्यक्ष राजाराम डाखोरे, प्रदेश सदस्य नाना देशमुख, हाजी सै. बुरहान, रमेश पाटील, समाधान राठोड, बब्बूभाई सलीमभाई, वासुदेव डोलारे उपस्थित होते.
बोरगावात ३५ ज्येष्ठांनी घेतली लस
बोरगाव मंजू: येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात ३५ ज्येष्ठांना लस देण्यात आली. यावेळी डॉ.राहिमीन खान, डॉ.श्रृती गिऱ्हे, डॉ.भगत, आनंद डामरे, जयेश लांडगे आदी लसीकरण मोहीम राबवित आहेत.
पिंजर येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
पिंजर: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक बेफिकीर होऊन वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे प्रयत्नही अपुरे पडत असल्याचे चित्र पिंजर गावात दिसत आहे.
आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची मनमानी
बोरगाव मंजू: आरोग्य केंद्रात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी जात असून, येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तपासणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अकोला-वाडेगाव रस्त्याचे काम रखडले!
वाडेगाव: येथील वाडेगाव-अकोला महामार्गाचे काम होण्यासाठी ग्रामस्थांनी निवेदन, तक्रारी, रस्ता रोको आंदोलन आदी प्रयत्न केले, परंतु ग्रामस्थांना लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच मिळाली. रस्त्याचे काम पूर्णपणे रखडल्याने, ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
कुरणखेड गावातील रस्त्यावर पसरला अंधार
कुरणखेड : ग्रामपंचायत कुरणखेडचे पथदिव्यांचे बिल थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने कुरणखेड गावातील पथदिव्यांचे वीज कनेक्शन कापले आहे. १४ लाख ५५ हजार रुपये वीजबिल थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने ही कारवाई केली. त्यामुळे गावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. कुरणखेड गावातील रस्त्यावर बुधवारपासून अंधार पसरला आहे.
रस्त्यासह पुलाचे बांधकाम निकृष्ट!
खेट्री : झरंडी ते सावरगाव येत असून, मागील एका महिन्याअगोदर रा. मा. क्र.२८४ चौफुली ते झारंडी सावरगाव नवीन रस्ता, तसेच त्यामधील पुलाचे काम चालू असून, रस्त्यासह पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असून, रस्त्यावर, तसेच पुलाच्या कामांमध्ये वापरण्यात आलेले संपूर्ण साहित्य लोखंड, सिमेंट, गिट्टी, डस्ट आदी निकृष्ट दर्जाची वापरण्यात येत आहे.