केवळ १८ मालमत्तांमुळे रखडले रोडचे रुंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:28 AM2017-07-27T03:28:39+5:302017-07-27T03:29:11+5:30

अकोला: गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणाला अवघ्या १८ मालमत्ताधारकांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित मोजमाप केल्यानंतर मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केल्याचे समोर आले आहे.

Widening of Rock Road due to only 18 properties | केवळ १८ मालमत्तांमुळे रखडले रोडचे रुंदीकरण

केवळ १८ मालमत्तांमुळे रखडले रोडचे रुंदीकरण

Next
ठळक मुद्दे कोणत्याही क्षणी मनपाचा ‘जेसीबी’ चाल करण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणाला अवघ्या १८ मालमत्ताधारकांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित मोजमाप केल्यानंतर मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला न्यायालयाच्या कचाट्यात अडकविण्याचा प्रयत्न करणाºया मालमत्ताधारकांच्या इमारतींवर कोणत्याही क्षणी मनपाचा ‘जेसीबी’ चाल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खड्ड्यांचे शहर ही ओळख पुसून काढण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. बांधकाम विभागामार्फत नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकपर्यंत एकूण २ हजार ६३१ मीटर अंतर व १५ मीटर रुंद रस्त्याच्या निर्माण कार्याला प्रारंभ करण्यात आला. गोरक्षण रोडवरील महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या ५०० मीटर अंतरावर रस्त्यालगतच्या मालमत्तांमुळे ‘बॉटल नेक’ (निमुळता भाग) तयार होण्याची चिन्हे आहेत. विकास आराखड्यानुसार गोरक्षण मार्गाची रुंदी २४ मीटर आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. विकास कामात सहकार्य करण्याऐवजी शहराच्या विविध भागात नियमांची पायमल्ली करून टोलेजंग इमारती उभारत स्वत:ची खिसे भरणाºया काही बिल्डरांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.
इमारती खाली करण्याची तयारी
इमारतींचे मोजमाप घेतल्यानंतर काही मालमत्ताधारकांनी इमारती, दुकाने खाली करण्याची तयारी दर्शविली आहे. अवैध बांधकाम पाडल्या जाण्याचे निश्चित असल्याने त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेत न अडकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

नकाशापेक्षा दुप्पट बांधकाम
इन्कम टॅक्स चौकात काही प्रख्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाणिज्य संकुलांचे मंजूर नकाशापेक्षा चक्क दुप्पट, तीनपट अवैध बांधकाम केले आहे. ‘डीसी रुल तसेच हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंग’च्या विषयावर मनपासह शासनाला सूचनांचे डोस पाजणाºया ‘के्रडाई’ संघटनेच्या पदाधिकाºयांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे. गोरगरिबांच्या झोपड्या, फेरीवाले, हातगाड्यांवर जेसीबी चालविण्याचे धाडस करणारे मनपा प्रशासन बड्या बिल्डरांच्या बांधकामावर कारवाई करणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Web Title: Widening of Rock Road due to only 18 properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.