विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा!

By admin | Published: July 17, 2017 03:33 AM2017-07-17T03:33:53+5:302017-07-17T03:33:53+5:30

अकोला : विदर्भात येत्या ४८ तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे.

Widespread warning in Vidarbha | विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा!

विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात येत्या ४८ तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. रविवारीही ही शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वाशिम येथे विदर्भात सर्वाधिक ३०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; परंतु वाशिमला लागूनच असलेल्या अकोला जिल्ह्यात शून्य पाऊस झाला आहे. तशी नोंद नागपूर वेधशाळेने केली आहे.
शुक्रवार-शनिवारी पूर्व विदर्भात गडचिरोलीत दमदार पाऊस झाल्यानंतर उर्वरित विदर्भातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. रविवारी विदर्भातील वाशिम जिल्हा सोडला, तर अमरावती येथे केवळ २.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा येथे ९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी येथे ११.२, चंद्रपूर ७.८, गोंदिया २.०, नागपूर येथे १.३ मि.मी., वर्धा १.० मि.मी., तर यवतमाळ येथे १३.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Widespread warning in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.