विधवांच्या मुलींना लग्नासाठी ४० हजार रुपये मिळणार!

By admin | Published: May 3, 2017 01:07 AM2017-05-03T01:07:15+5:302017-05-03T01:07:15+5:30

अकोला: विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता महिलांच्या उपवर मुलींच्या शुभमंगल कार्यासाठी ४० हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने केली आहे.

Widows of girls will get 40 thousand rupees for marriage! | विधवांच्या मुलींना लग्नासाठी ४० हजार रुपये मिळणार!

विधवांच्या मुलींना लग्नासाठी ४० हजार रुपये मिळणार!

Next

अकोला: विधवा, घटस्फोटित महिलेच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र सरकारने एक चांगला निर्णय घेतल्यामुळे विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता महिलांच्या उपवर मुलींच्या शुभमंगल कार्यासाठी ४० हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने केली आहे. ही घोषणा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसेच राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी जाहीर केली. याचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असावे तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न १ लाखापर्यंत असणे आवश्यक आहे.
विधवा महिलांना तसेच घटस्फोटिता महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्यता दिली असून, महिला व बालकल्याण विभाग ही योजना राबविणार आहे. गत तीन वर्षापासून असलेल्या या मागणीकरिता स्वामिनी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. या योजनेच्या अधिक माहितीकरिता स्वामिनी संघटना कार्यालय, रणपिसे नगर येथे कार्यालयीन वेळेत संघटनेचे अध्यक्ष संजय कमल अशोक यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Widows of girls will get 40 thousand rupees for marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.