पत्नीचा पतीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 06:29 PM2019-01-13T18:29:39+5:302019-01-13T18:29:44+5:30
अकोला : माता नगर माहेर असलेली एक महिला मुलाच्या वाढदिवसानिमित्त माहेरी आल्यानंतर याच वाढदिवसानिमित्त पती सासुरवाडीला गेला असता त्याच्यावर पत्नीने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी उशिरा रात्री घडली.
अकोला : माता नगर माहेर असलेली एक महिला मुलाच्या वाढदिवसानिमित्त माहेरी आल्यानंतर याच वाढदिवसानिमित्त पती सासुरवाडीला गेला असता त्याच्यावर पत्नीने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी उशिरा रात्री घडली. पतीच्या डोक्यावर हल्ला झाल्याने या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पतीने रामदासपेठ पोलीस ठाण्यात पत्नी व सासूविरुद्ध तक्रार दिली असता पोलिसांनी दोघींवरही गुन्हा दाखल केला आहे.
मंगेश गणेश तायडे (वय २८) असे मारहाण करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंगेश त्याच्या पत्नी व दोन मुलांसह उल्हासनगर येथे राहून मोलमजुरी करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा पत्नीसोबत वाद झाल्याने पत्नी माता नगर येथे माहेरी आली. त्यानंतर तो दोन्ही मुलांना घेऊन तिच्यापाठोपाठ आला होता. शुक्रवारी एका मुलाचा वाढदिवस असल्याने तो पत्नीच्या आईकडे म्हणजेच सासरी आला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाले म्हणून मंगेश त्याच्या आईकडे निघून गेला; मात्र पत्नीच्या माहेरी असलेली बॅग घेण्यासाठी तो पुन्हा गेला असता त्याची सासू कोकिळा खरात हिने त्याची कॉलर पकडली व मुलगी पाठविण्यास नकार देत तुझी दोन्ही मुले घेऊन जा, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर मंगेश आल्यापावली परतला असता त्याच्या पत्नीने त्याच्या डोक्यावर मागून कुºहाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सासू व त्याच्या पत्नीविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.