पत्नीला पतीनेच जिवंत जाळले!

By admin | Published: February 3, 2017 12:13 AM2017-02-03T00:13:22+5:302017-02-03T00:13:22+5:30

चोहोट्टाबाजार परिसरात खळबळ; पतीस अटक

Wife burnt alive alive! | पत्नीला पतीनेच जिवंत जाळले!

पत्नीला पतीनेच जिवंत जाळले!

Next

चोहोट्टा बाजार (जि. अकोला), दि. १-येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे येथे एका विवाहित महिलेला तिच्या पतीने जिवंत जाळल्याची अमानवी घटना मंगळवार, ३१ जानेवारीच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चोहोट्टा बाजार परिसरात खळबळ उडाली.
करतवाडी रेल्वे येथील रहिवासी असलेला आरोपी आकाश ऊर्फ अशोक किरडे (४0) याने आपल्या मंगला (३८) नमाक पत्नीला आपल्या घरातच दोरीने बांधून जिवंत जाळले. या घटनेत पूर्णपणे भाजलेल्या मंगलाचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीकरिता अकोला येथे पाठविले. मृत मंगलाचे मावसे सुरेश एकीरे यांच्या फिर्यादीवरून दहीहांडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दोनकलवार, पोहेकॉं. वाघळकर, इंगळे, ठाकूर करीत आहेत. याप्रकरणी आरोपी आकाश किरडे यास न्यायालयात उभे केले असता, न्यायाधिशांनी त्यास ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चिमुकलीचे मातृत्व हरविले
या घटनेत मृत पावलेल्या मंगला नामक महिलेला तीन चिमुकल्या मुली आहेत. वडिलांच्या अमानवी कृत्यामुळे तिघींवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Wife burnt alive alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.