पत्नीस छळणाऱ्या पतीला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 01:35 AM2017-07-06T01:35:22+5:302017-07-06T01:35:22+5:30

अकोला : पत्नीला अमानुषपणे छळणाऱ्या खदान परिसरातील पती मोहम्मद हनीफ मोहम्मद इब्राहीम याला एका दिवसाच्या पोलीस कोठडीत रवाना करण्यात आले.

Wife to persecute wife | पत्नीस छळणाऱ्या पतीला कोठडी

पत्नीस छळणाऱ्या पतीला कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पत्नीला अमानुषपणे छळणाऱ्या खदान परिसरातील पती मोहम्मद हनीफ मोहम्मद इब्राहीम याला एका दिवसाच्या पोलीस कोठडीत रवाना करण्यात आले. खदान पोलिसांनी या आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
स्थानिक खदान पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुल्लानी चौक परिसरातील निवासी मोहम्मद हनीफ हा त्याच्या पत्नीला अमानुषपणे छळतो आहे. तीन महिन्यांआधी आरोपीने पत्नीच्या मुजफ्फर नगरातील घरी जाऊनही मारहाण केली. या छळाला कंटाळल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. शारीरिक व आर्थिक छळप्रकरणी विवाहितेने पती व त्याच्या दोन मित्रांविरोधात रामदासपेठ पोलीस स्टेशनला २१ मार्च २०१७ रोजी तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा वगळता कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा २३ मार्च २०१७ रोजी नोंदविला. रामदासपेठ पोलिसांनी तब्बल तीन महिन्यानंतर अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस निरीक्षक शैलेष सपकाळ यांनी या रामदासपेठ पोलीस ठाण्याचा प्रभार घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, त्यांनी या प्रकरणात अत्याचाराचा गुन्हाही नोंदवायला लावला. त्यानुसार या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. विवाहितेने पती व इतर नातेवाइकांकडून मारहाण, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी दिल्या जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सपकाळ यांना दिली. त्यानुसार त्यांनी तत्काळ तपास अधिकाऱ्यास तिचा पती मो. अली मो. इब्राहीम (रा. खदान) यास अटक करण्याचे आदेश दिले.

Web Title: Wife to persecute wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.