वन्य प्राण्यांची पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:05+5:302021-05-01T04:17:05+5:30

-------------------------------- माझोड-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था! माझोड : माझोड-वाडेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम सुरू ...

Wild animals rush to urban areas in search of water! | वन्य प्राण्यांची पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव!

वन्य प्राण्यांची पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव!

Next

--------------------------------

माझोड-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था!

माझोड : माझोड-वाडेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी पांडुरंग बंड, विनोद ताले, देवानंद खंडारे, राजेश ठाकरे, प्रकाश पाटील,रणजित खंडारे, राजेश ताले, प्रमोद खंडारे, नितेश बराटे, महेश ढोरे, श्रीकृष्ण खंडारे, अमोल काळे, शिवलाल ताले, विपुल खंडारे आदींनी केली आहे.

-------------------------

वाडेगावात रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या !

वाडेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकालगत भाजी, फळ तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

-------------------------------------

ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक

बार्शीटाकळी : गेल्या पंधरवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीला शहरी भागात रुग्ण आढळून येत होते. आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील वरखेड येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

----------------------------------------------------

बाभूळगाव-माझोड रस्त्यावर खड्डे

पातूर: तालुक्यातील बाभूळगाव-तांदळी-माझोड रस्त्यावर डांबरीकरण झाल्यापासून रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

-------------------------------

खाद्यतेलाचे दर आवाक्याबाहेर

मूर्तिजापूर: कोरोना संकटात अर्थव्यवस्था ढासळत असताना महागाई मात्र वरचढ होत आहे. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही. शासनाकडून योजनेचे पैसे मिळत नाहीत. अशा अवस्थेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र गगनाला भिडलेल्या आहेत. सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

-----------------------------

नवथळ येथील प्रवासी निवारा शोभेचा

आगर: उगवा-आगर मार्गावर असलेला नवथळ येथील प्रवासी निवारा सध्या शोभेची वास्तू बनलेला आहे. बऱ्याच गाड्यांचा थांबा असल्यामुळे नवथळ, पाळोदी येथील प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याबाहेर उभे राहून गैरसोयीचा सामना करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-------------------------

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

अकोट: शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले तरी, ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.

---------------------------------------

वनविभागाच्या निवासाची दुरवस्था

पातूर: वन कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून निवासस्थान तयार केले. नियोजनाअभावी या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील पांढुर्णा परिसरात असलेले निवासस्थान भुईसपाट झाले आहे.

-----------------------

गावागावांत वाहतोय हातभट्टीचा महापूर

बार्शीटाकळी: कोरोना संचारबंदीमुळे मान्यताप्राप्त दारु दुकाने बंद आहेत. परिणामी मद्यपी हातभट्टीच्या दारुकडे वळले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु गाळली जात असून, प्रत्येक गावात ही दारु सहज उपलब्ध होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-----------------------------------

भाजीबाजारात उसळते नागरिकांची गर्दी

बाळापूर: शहरात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भाजीबाजार भरविला जातो; मात्र या ठिकाणी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. दुकानदार अगदी जवळजवळ दुकाने लावत असून ग्राहकही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाही. यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

----------------------------------------

बाळापूर तालुक्यात रेती तस्करी जोमात

बाळापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत बाळापूर तालुक्यातील लिलाव न झालेल्या घाटांवर सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

------------------------------------

वॉटर प्लांटचे मालक सापडले अडचणीत

तेल्हारा: शहर व तालुक्यातील वॉटर प्लांटचे मालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. उन्हाळ्यात व्यावसायिक, लग्न व इतर सोहळे, धार्मिक कार्य, यात्रा उत्सवात त्यांच्याकडील पाण्याला मोठी मागणी असते ; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बंद असल्याने मागणी अत्यल्प आहे.

-----------------------------------

दिव्यांगांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष

पातूर: कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. संक्रमण टाळता यावे, म्हणून प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे, पण या अभियानात दिव्यांगांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या अभियानात दिव्यांगांसाठी कोणताही विशेष दिवस नाही. विशेष व्यवस्था दिसून येत नाही. प्रशासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

-----------------------------------------

शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब!

वाडेगाव: शेतकऱ्यांनी दि. ३१ मार्च अगोदर नियमित कृषी कर्जाचा भरणा केला आहे. या कर्जावर व्याज लागू नये, म्हणून इकडून तिकडून पैसे गोळा करून हे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी फेडले; मात्र बँकेत सात-बारा देऊनही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Web Title: Wild animals rush to urban areas in search of water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.