वन्यजीव रक्षकांनी नागपंचमीच्या दिवशी १९ सापांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:21 AM2021-08-15T04:21:03+5:302021-08-15T04:21:03+5:30
जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन बहूद्देशीय संस्था संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशिव, सर्पमित्र सूरज सदांशिव, सर्पमित्र संजय दौंड, सर्पमित्र प्रशांत नागे मंगेश ...
जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन बहूद्देशीय संस्था संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशिव, सर्पमित्र सूरज सदांशिव, सर्पमित्र संजय दौंड, सर्पमित्र प्रशांत नागे मंगेश तायडे, योगेश तायडे, प्रफुल सदांशिव, दत्ता महल्ले, रत्नदीप सरकटे, राजेश रायबोले, योगेश तायडे, स्वप्निल सरदार, प्रवीण वाघमारे, रितेश बोबळे, अभी इंगळे, अजय हिंगगणे, गुड्डू खरात, संदीप शेकोकार, अभी इंगळे, शुद्धोधन वानखडे अहोरात्र झटत आहेत.
अकोला जिल्ह्यात साप आढळून आल्यास सर्पमित्र घटनास्थळी धाव घेऊन सापांना जीवदान देण्याचे कार्य करीत आहेत. सर्पदंश झालेल्या नागरिकांसह महिलांनादेखील त्यांनी जीवदान दिले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळून आलेल्या सापांना पकडून पर्यावरणात जंगल परिसरात सोडून दिले, तर काही विहिरीमध्ये पडलेल्या सापांना विहिरीतून काढून त्यांचे प्राण वाचविले.
------------------------------
नागपंचमीनिमित्त या सापांना दिले जीवनदान
जिल्ह्यात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पमित्रांनी विविध भागात नागपंचमीनिमित्त दोन तासात एकूण वीस सापांना जीवदान दिले आहे. यामध्ये विषारी साप, चार घोणस साप, पाच नाग, एक मण्यार यांचा समावेश आहे.
-------------
दिवसेंदिवस ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक सर्पमित्र यांना संपर्क करत आहेत. पर्यावरण संतुलित राहण्यासाठी नागरिकांनी चिंतन करायला पाहिजे.
- सूरज सदांशिव, सर्पमित्र.