रिपाइं विदर्भात उमेदवार उभे करणार?
By admin | Published: September 21, 2014 01:37 AM2014-09-21T01:37:11+5:302014-09-21T01:37:11+5:30
महायुतीत दोन जागावर दावा
अकोला : आघाडी, युतीमध्ये जागा वाटपावरू न धुसफूस सुरू च असल्याने या पक्षासोबत असलेल्या घटक पक्षामध्ये अस्वस्थता पसरली आहे. महायुती झाली नाही तर मात्र रिपाइं (आठवले गट) नवा पर्याय शोधणार असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्याने विदर्भातील रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षाध्यक्षांच्या आदेशाची वाट पाहात असल्याचे वृत्त आहे. महायुती झाली तर मात्र विदर्भातील दोन विधानसभा जागांवर रिपाइंने दावा केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
अनेक छोटे-मोठे पक्ष या आघाडी,युतीच्या आसर्याला गेलेली आहेत. पण सत्तेची स्वप्न पाहणार्या या पक्षामध्ये जागा वाटपाबाबत अद्याप एकमत झालेले नाही. २0 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाल्याने या घटक पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महायुतीसोबत असलेल्यामध्ये राज्यातील काही विशिष्ट पॉकेट सोडले तर विदर्भात फारशी ताकद नाही. शिवसंग्रामने जिल्हय़ात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नेत्यांची अकोला जिल्हयातील एका मतदार संघाची मागणी आहे. रिपाइंची फळी मात्र विदर्भात आहे. त्यामुळे विदर्भातील कार्यकर्त्यांंमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये, यासाठी, रिपाइं विदर्भात दोन जागांवर लढणार असल्याचे वृत्त आहे.यासाठी रिपाइंने जिल्हाध्यक्ष बदलले असून, नव्या समीकरणांची जुळवा-जुळव सुरू केली आहे. अकोल्याची धुरा रामदास आठवले यांनी आपले विश्वासू अशोक नागदिवे यांच्यावर सोपविली आहे.