पंदेकृवि कुलगुरू पदाची निवड लांबणार?
By admin | Published: June 10, 2017 02:37 AM2017-06-10T02:37:35+5:302017-06-10T02:37:35+5:30
समितीचे गठन; अद्याप नोटिफिकेशन नाही
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. कुलगुरू ंचा कार्यकाळ संपण्याच्या तीन महिने अगोदर या पदासाठीच्या हालचाली सुरू होत असतात. राज्यपाल यांनी या निवड प्रक्रियेसाठी समितीचे गठन केले आहे; परं तु यासंदर्भातील नोटिफिकेशन काढले नसल्याने ही निवड लांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या कृषी विद्यापीठाचे डॉ. दाणी हे १३ वे कुलगुरू आहेत. १४ व्या कुलगुरू ची निवड ऑगस्टमध्ये होणार आहे. याकरिता कृषी विद्यापीठाचे आजी-माजी संचालक, शास्त्रज्ञ स्पर्धेत उतरले आहे; परंतु अद्याप नोटिफिकेशन निघाले नसल्याने कृषी विद्यापीठ कर्मचार्यांचे लक्ष याकडे लागले आहे.
या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली आहे. समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरूपदासाठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करणार आहे. ते सादर करण्यासाठी अगोदर नोटिफिकेशन निघणे गरजेचे आहे.
दरम्यान, हे नोटिफि केशन न निघाल्याने ही निवड प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. या अगोदर असाच विलंब झाला होता, त्यामुळे या कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळी नोटिफिकेशनसाठी विलंब होत असल्याने शासन काय निर्णय घेते, हे बघावे लागणार आहे.