पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लावणार

By admin | Published: November 22, 2014 02:00 AM2014-11-22T02:00:46+5:302014-11-22T02:00:46+5:30

लोकमत संवाद कार्यक्रमात गोवर्धन शर्मा यांचे आश्‍वासन.

Will solve the problems of water supply | पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लावणार

पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लावणार

Next

अकोला : सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाण पूल, स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधांपासून दूर असलेल्या अकोला शहराच्या विकासाच्या दृष्टीने विधानसभेच्या अकोला पश्‍चिम मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शुक्रवारी ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमात मनमोकळी चर्चा केली. मंत्रिपदापेक्षा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधी खेचून आणण्यात आपल्याला रस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मतदारसंघात राबविण्यात येणार्‍या विविध विकास योजनांसोबतच शहरातील राजकारणावर लोकमतच्या संपादकीय विभागातील सहकार्‍यांशी दिलखुलास चर्चा केली.

प्रश्न : शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराल ?
आ. शर्मा : मोर्णा प्रकल्पातून अकोला शहरात पाईप लाईन टाकण्यासाठी ४0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही योजना मंजूर झाल्यास पाणी पुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लागेल.

प्रश्न : अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा कसा काढता येईल?
आ. शर्मा : मनपाने शहरात हॉकर्स झोन तयार करावेत. यासाठी मनपाने प्रस्ताव दिल्यास आमदार कोट्यातून अथवा शासनाकडून मदत मिळवून देऊ. अतिक्रमण मोहिम एकतर्फी राबविल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. परिणामी बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रश्न : सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमच्या कोणत्या योजना आहेत?
आ. शर्मा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी दोन उड्डाण पूल आणि २0 पेक्षा जास्त रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. यापूर्वी राज्यात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ विरोधीपक्षाची सत्ता होती. त्यामुळे निधी कमी मिळत होता.मात्र आता राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने निधीसाठी प्रयत्न करु.

प्रश्न : आपण सलग पाचव्यांदा निवडून आलात; आपल्या यशाचे गमक काय?
आ. शर्मा : मी दोनवेळा नगर परिषद आणि पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकलो. प्रत्येक वॉर्डाचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले. वॉर्डातील समस्या सुटण्यासाठी थेट नागरिकांशीच संपर्क साधला. वॉर्डात रस्ते, पथदिवे, स्वच्छता आणि सभागृहांसाठी भरीव निधी दिला. १८ कोटी ५0 लाख रुपये खर्च करुन पूर संरक्षण भिंत बांधली. नवीन दगडी पूल बांधला. महामार्गाच्या चौपदरीसाठी प्रयत्न केले. जुने शहरात विद्युत उपकेंद्र आणले. वाण धरणातील पाणी अकोला शहरात आणण्यासाठी पाईप लाईन टाकली. मी रामनवमी शोभा यात्रा उत्सव समितीचा सर्वसेवाधिकारी या नात्याने केवळ अकोला शहरातीलच नव्हे ,तर जिल्ह्यातील गरजूंना मदतीचा हात दिला.राजकारणात मी कधीही कोणावर आरोप-प्रत्यारोप केले नाही. मी नेहमीच माणसं जोडण्यासाठी प्रयत्न करतो. राजकारणात जनतेच्या विश्‍वासला तडा जाईल, असे एकही कृत्य माझ्या हातून घडलेले नाही आणि घडणारही नाही.

प्रश्न : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असल्याचे त्याचा परिणाम उद्योगावरही होत आहे. त्यावर काही ठोस उपाय शोधता येतील काय ?
आ. शर्मा : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. शहरात आमदार निधीतून ७ पोलिस चौकी बांधून दिल्या होत्या. त्यापैकी आज केवळ एकच पोलिस चौकी सुरु आहे. पोलिस दलातच अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे अकोल्यात पोलिस आयुक्तालय मंजूर करण्याची मागणी केली होती. आता राज्यात भाजपची सत्ता असल्याने पोलिस आयुक्तालयासाठी प्रयत्न करु.

Web Title: Will solve the problems of water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.