जिल्हा परिषदेत पदाधिकारी विरुद्ध अधिकारी वाद पेटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:51 PM2020-06-21T12:51:17+5:302020-06-21T12:51:35+5:30
जिल्हा परिषदेत पदाधिकारी-सदस्य विरुद्ध अधिकाºयांचा वाद चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
अकोला : जिल्ह्यातील शाळा इमारतींच्या दुरुस्तीचा निधी अखर्चित राहिल्याच्या मुद्यावर झालेल्या खडाजंगीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी सभागृह सोडल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेत पदाधिकारी-सदस्य विरुद्ध अधिकाºयांचा वाद चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेला निधी अखर्चित राहिल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विचारणा करण्यात आली. शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ५० लाख रुपये कामांच्या प्रस्तावावर २७ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे या कामांचा प्रस्ताव विहित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे सादर होऊ शकला नसल्याने, अखर्चित निधी शासनाकडे परत करण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सभेत दिली. शिक्षण सभापतींनी दिलेल्या माहितीवर आक्षेप घेत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांनी चुकीचे आरोप करणे योग्य नसून, यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगत, अधिकाºयांना सभागृह सोडण्यास सांगितले होते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनीदेखील अधिकाºयांना सभागृह सोडून जाण्याचे आवाहन केले. त्यानुसार सभेला उपस्थित जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी सभागृह सोडले. कॅफो आणि सीईओ यांच्या आवाहनानुसार अधिकाºयांनी सभागृह सोडल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेत आता पदाधिकारी विरुद्ध अधिकाºयांचा वाद चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
ग्रामविकास मंत्री, आयुक्तांकडे तक्रार करणार- सुलताने
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सभागृह सोडण्याचे अधिकाºयांना आवाहन केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या ‘कॅफो’ आणि ‘सीईओ’ विरुद्ध ग्रामविकास मंत्री, मुख्य सचिव व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात सोमवारी जिल्हा परिषदेतील गटनेत्यांसोबत चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सांगितले.
अधिकाºयांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही - डॉ. पुंडकर
जिल्हा परिषदेत अधिकाºयांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही आणि मुजोर अधिकाºयांना वठणीवर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
चौकशीत सत्य बाहेर येईल-सीईओ
लोकशाहीत कोणीही कोणाविरुद्ध तक्रार करू शकते. त्यामुळे आमच्याविरुद्ध तक्रार करण्यास हरकत नाही. तक्रारीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुभाष पवार यांनी दिली.