वारे वा, घनकचऱ्यातूनही लाटला मलिदा; अधिकाऱ्याचे खिसे गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:24 AM2021-09-17T04:24:10+5:302021-09-17T04:24:10+5:30

नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर घनकचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण केले जात असल्याचा महापालिकेचा दावा पाेकळ ठरला आहे. याठिकाणी ...

The wind blows, even the solid waste waves Malida; The officer's pockets are hot | वारे वा, घनकचऱ्यातूनही लाटला मलिदा; अधिकाऱ्याचे खिसे गरम

वारे वा, घनकचऱ्यातूनही लाटला मलिदा; अधिकाऱ्याचे खिसे गरम

Next

नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर घनकचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण केले जात असल्याचा महापालिकेचा दावा पाेकळ ठरला आहे. याठिकाणी कचरा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने कचरा संकलन करणाऱ्या वाहन चालकांना परत यावे लागत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया हाेत असेल, तर जागा का उपलब्ध नाही, असा सवाल उपस्थित झाला असून, याप्रकरणी मनपातील एका अधिकाऱ्याने व एका उपअभियंत्याने मलिदा लाटल्याची माहिती आहे.

शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने महापालिकेला ४५ काेटींचा निधी दिला. घनकचऱ्यावर शास्त्राेक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन आयुक्त अजय लहाने, जितेंद्र वाघ यांनी शहरालगतच्या भाेड गावानजीक १९ एकर शासकीय जमीन अधिग्रहित केली. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्या कालावधीत सप्टेंबर २०२० मध्ये मे. परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीला घनकचऱ्यावर प्रक्रियेसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला हाेता. वर्कऑर्डर दिल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये कंत्राटदाराने डम्पिंग ग्राउंडवर बायाेमायनिंगद्वारे कचऱ्याच्या वर्गीकरणाला सुरुवात केली.

हे प्रश्न अनुत्तरित का?

कंत्राटदारामार्फत वर्गीकरण केलेल्या कचऱ्यातून माती, प्लास्टिक, काचाचे तुकडे वेगळे केले जात असतील, तर आजवर किती टन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले, कंपाेस्ट खताची विक्री करण्यात आली का, असेल तर किती टन खत निर्मिती झाली, खताची विक्री काेणाला केली, त्याचे जीएसटीसह देयक आहे का, तसेच प्लास्टिक व काचाच्या तुकड्यांची काेठे विक्री केली, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे बांधकाम विभागाकडे नाहीत.

आयुक्त मॅडम हे चाललेय काय?

घनकचऱ्याचा विषय मुळातच स्वच्छता व आराेग्य विभागाच्या अखत्यारीत असणे अपेक्षित आहे. भाेड येथील जागेत प्रकल्पाच्या निर्माण कार्यावर देखरेख ठेवण्यापुरती जबाबदारी बांधकाम विभागाची असली तरी कचऱ्याच्या वर्गीकरणाची सूत्रे हातामध्ये ठेवण्यासाठी हा विभाग जिवाचा आटापिटा का करताेय, याचे काेडे नवनियुक्त आयुक्त कविता द्विवेदी उलगडतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

२ काेटींचे देयक अदा तरीही...

घनकचऱ्याची अचूक माेजदाद करणारी यंत्रणा मनपाकडे उपलब्ध नसताना शहरात दैनंदिन २२५ टन कचऱ्याचे निर्माण हाेत असल्याचा प्रशासनाकडून दावा केला जाताे. आजवर कंत्राटदाराला २ काेटींचे देयक अदा करण्यात आले. तरीही डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागा नाही, हे विशेष.

Web Title: The wind blows, even the solid waste waves Malida; The officer's pockets are hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.