अकोला जिल्ह्यात लाखावर मतदार ओळखपत्राविना

By admin | Published: February 3, 2015 12:35 AM2015-02-03T00:35:32+5:302015-02-03T00:35:32+5:30

१३ लाखांवर मतदारांना ओळखपत्रांचे वितरण.

Without Voter ID card in Akola district Lakhan | अकोला जिल्ह्यात लाखावर मतदार ओळखपत्राविना

अकोला जिल्ह्यात लाखावर मतदार ओळखपत्राविना

Next

संतोष येलकर / अकोला: मतदार जागृतीबाबत प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असल्या तरी जिल्ह्यातील १४ लाख ३0 हजार ९६२ पैकी १३ लाख २0 हजार ४९ मतदारांनाच जानेवारीअखेर मतदार ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील १ लाख १0 हजार ९१३ मतदार अद्यापही ओळखपत्राविना असल्याची बाब समोर येत आहे. जिल्ह्यात आकोट, बाळापूर, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी जिल्हा प्रशासनामार्फत मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो तसेच विशेष मोहीमदेखील राबविली जाते. त्यामध्ये नवीन मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यासह ओळखपत्र वाटप करण्यासाठी नमुना अर्जदेखील भरून घेतले जातात. मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे व मतदार ओळखपत्रांसाठी अर्ज सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येतात. तरीही जिल्ह्यात लाखांवर मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्याची स्थिती आहे. या १ लाख १0 हजार ९१३ मतदारांना ओळखपत्रांचे वितरण केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Without Voter ID card in Akola district Lakhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.