प्राणघातक हल्लाप्रकरणी साक्षीदारांचे बयाण नोंदविले

By admin | Published: July 20, 2016 01:36 AM2016-07-20T01:36:39+5:302016-07-20T01:36:39+5:30

खेट्री येथील घटनेतील चारही आरोपी तुरुंगात; चान्नी पोलिसांनी रविवारी साक्षीदारांचे बयाण नोंदविले.

Witness statements of deadly attack | प्राणघातक हल्लाप्रकरणी साक्षीदारांचे बयाण नोंदविले

प्राणघातक हल्लाप्रकरणी साक्षीदारांचे बयाण नोंदविले

Next

खेट्री (जि. अकोला): येथील प्राणघातक हल्लाप्रकरणी चान्नी पोलिसांनी रविवारी साक्षीदारांचे बयाण नोंदविले. या बयाणामध्ये शिरपूर येथील लड्डखा यांनी सहकार्‍यांसह एकूण सात जणांनी नबी खा यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे सागितले.
देवळगाव येथील नबी खा हे काही कामानिमित्त खेट्री येथे २३ फेब्रुवारी रोजी आले असता, शिरपूर येथील अमिनउल्ला खा ऊर्फ लड्डखा यांनी आपल्या सहकार्‍यांसह नबीखा यांच्यावर लाठय़ा व लोखंडी पाइपने प्राणघातक चढविला होता. यात नबीखा यांचा पाय फ्रॅर झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नबीखा यांची जबानी रिपोर्टवरून चान्नी पोलिसांनी सात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली होती. महिला आरोपीची अटकपूर्व जामिनावर सुटका झाली होती. तेव्हापासून चार आरोपी फरार होते. त्यांना ११ जुलै रोजी चान्नी पोलिसांनी अटक करून १२ जुलै रोजी पातूर न्या. हजर केले असता, त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. १५ जुलै रोजी पातूर न्यायालयाने चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर चारही आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी रविवारी साक्षीदारांचे बयाण नोंदविले.

Web Title: Witness statements of deadly attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.