‘घाेणस अळी’चा महिलेला डंख, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:50 AM2022-09-19T06:50:19+5:302022-09-19T06:50:43+5:30

विदर्भातील काही भागांत सोयाबीनवर घोणस नावाच्या बहुभक्ष्यी विषारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे

Woman bitten by 'dirty worm', admitted to hospital | ‘घाेणस अळी’चा महिलेला डंख, रुग्णालयात दाखल

‘घाेणस अळी’चा महिलेला डंख, रुग्णालयात दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार/अकोला : पिवळ्या विषारी  ‘घाेणस अळी’ने पूर्व विदर्भानंतर आता पश्चिम विदर्भात शिरकाव केला असून, वाशिम जिल्ह्यातील माळशेलू येथील महिला रविवारी शेतात काम करीत असताना  या अळीने तिला डंख मारला, यामुळे त्या  महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. 

विदर्भातील काही भागांत सोयाबीनवर घोणस नावाच्या बहुभक्ष्यी विषारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बांधावरील गवत, एरंडी, आंबा झाडे व फळपिकावर ती आढळून येत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, ही अळी वाशिम  जिल्ह्यातील  साेयाबीन पिकावर   माेठ्या प्रमाणावर आढळून आली आहे. या अळीच्या अंगावरील बारीक काट्यांत विषग्रंथी असून, तो काटा माणसाच्या त्वचेत टोचून अळी विषारी रसायन शरीरात सोडते. त्यामुळे त्वचेवर परिणाम होऊ लागतो. तसेच बेशुद्धही पडू शकताे.

Web Title: Woman bitten by 'dirty worm', admitted to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.