उड्डाणपुलावर दुचाकी कारच्या अपघातात महिला जागीच ठार
By सचिन राऊत | Published: August 11, 2023 04:48 PM2023-08-11T16:48:33+5:302023-08-11T16:49:44+5:30
भीषण अपघातात महिलेचे शिर धडापासून वेगळे; शरीरापासून शिर वेगळे झाल्यानंतर गेले २५ फुट दूर.
सचिन राऊत, अकोला: सिंधी कॅम्प येथील रहीवासी महिला तीच्या मुलांना शाळेत साेडल्यानंतर घरी परतत असतांना उड्डाणपुलावर या महिलेला भरधाव कारने जबर धडक दिल्यानंतर या भीषण अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ भयंकर घडलेल्या या अपघातात महिलेचे शिर शरीरापासून वेगळे हाेत तब्बल १५ फुट दुर गेल्याने प्रत्यक्षदर्शिंचा थरकाप उडाला़ या घटनेची माहीती मिळताच पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सिंधी कॅम्पमधील रहीवासी नेहा सचूमल सचवानी वय २३ वर्ष ही महिला त्यांच्या मुलांना शुक्रवारी सकाळी शाळेत साेडण्यासाठी गेल्या हाेत्या़ मुलांना शाळेत साेडून एम एच ३० बीके ६९९३ क्रमांकाच्या दुचाकीने त्या परत उड्डाणपुलावरुन सिंधी कॅम्पकडे येत असतांना त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने जबर धडक दिली़ या भिषन अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला तर शिर शरीरापासून वेगळे झाल्यानंतर तब्बल २५ फुटापेक्षा अधिक दुर फरपटत गेले़ या घटनेची माहीती मीळताच सिटी काेतवाली, सिव्हील लाइन्स, खदान पाेलिस व वाहतुक शाखेच्या पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली़ त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठवीला़ ज्या कारमुळे हा भिषन अपघात घडला त्या कारचालकाला ताब्यात घेण्यात आले असून कारही जप्त करण्यात आली आहे़ या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास करीत आहेत़
शिर फरपटत गेल्याने किंचाळ्या
उड्डाणपुलावर दुचाकीच्या भिषन अपघातानंतर महिलेचा जागेवरच मृत्यू झाला तर तीचे शिर शरीरापासून वेगळे हाेत तब्बल २५ फुटापेंक्षा अधिक दुर फरपटत गेले़ यावेळी उड्डाणपुलावर असलेल्यांच्या आपाेआपच किंचाळ्या निघाल्याची माहीती प्रत्यक्षदर्शिंनी दिली़ या भीषण अपघातानंतर एकाला याच ठिकाणी दातखळीही बसल्याची माहीती आहे़
उड्डाणपुल धाेकादायक
उड्डाणपुलावरील वाहतुक सुसाट असल्याचे वास्तव आहे़ या वाहतुकीवर नियंत्रण मीळविण्यासाठी पाेलिसांचे काहीही प्रयत्न नसल्याची माहीती आहे़ काही दिवसातच पुल बंद करण्यात आला तर अपघातांचेही सत्र सुरु असल्याने हा उड्डाणपुल धाेकायदायकच असल्याच्या प्रतीक्रीया उमटत आहेत़