झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलेला ठगविले

By admin | Published: May 23, 2014 10:45 PM2014-05-23T22:45:29+5:302014-05-24T19:55:28+5:30

झटपट कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अकोला शहरातील एका महिलेची फसवणूक!

The woman has been fooled by the lure of giving instant loans | झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलेला ठगविले

झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलेला ठगविले

Next

अकोला: जाहिरातीच्या माध्यमातून झटपट कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका महिलेची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहरातील रामनगरात राहणार्‍या सुषमा महेशकुमार दीक्षित (६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रामध्ये झटपट कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात एक जाहिरात प्रकाशित झाली होती. आपण ही जाहिरात पाहून, दिलेल्या क्रमांकावर फोन केला. फोनवर एका संबंधित व्यक्तीने त्वरित कर्ज उपलब्ध करून देणार्‍या योजनांसंदर्भात माहिती देत, कुबेर फायनान्स आणि महाराष्ट्र फायनान्स योजनेची सुद्धा माहिती दिली. या योजनांतर्गत कर्ज पाहिजे असल्यास काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे दिल्यास त्वरित कर्ज उपलब्ध करण्यात येईल, असे संबंधित व्यक्तीने आश्वासन दिले आणि संबंधित व्यक्तीने आपल्याला अनामत रक्कम काही रोख बँकेतील खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यामुळे सुषमा दीक्षित यांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये १ लाख २४ हजार ९५0 रुपयांची रोख जमा केली. त्यानंतर मात्र संबंधित व्यक्तीने सुषमा दीक्षित यांना प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुषमा दीक्षित यांनी शुक्रवारी दुपारी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात धाव घेतली. दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी रितू रानी, सतीशकुमार, रवीकुमार, अरुणकुमार, अनिल मित्तल, विजय जैन आदींविरूद्ध भादंवि कलम ४२0 (३४) गुन्हा दाखल केला.

Web Title: The woman has been fooled by the lure of giving instant loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.