एसटी बसमधून महिलेची दागिन्यांची पर्स लंपास

By admin | Published: May 7, 2017 07:37 PM2017-05-07T19:37:48+5:302017-05-07T19:37:48+5:30

महिलेची एसटी बसमधून सोन्याच्या दागिन्यांची पर्स लंपास झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

Woman jewelery wallets from ST bus | एसटी बसमधून महिलेची दागिन्यांची पर्स लंपास

एसटी बसमधून महिलेची दागिन्यांची पर्स लंपास

Next

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट; गुन्हा दाखल
अकोला : लग्नासाठी बाहेरगावी जाणार्‍या महिलेची एसटी बसमधून सोन्याच्या दागिन्यांची पर्स लंपास झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लग्नसराईचे दिवस आणि उन्हाळी सुट्टय़ांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. एसटी बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी धडपड करीत आहेत. याचा फायदा बसस्थानकावर सक्रिय असलेले चोरटे घेत आहेत. दररोज बसस्थानकावर चोरीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी एका प्रवाशाने मोबाइल चोरताना रंगेहात पकडल्याची घटना घडत नाही तो, पुन्हा रविवारी चोरट्याने महिलेची दागिन्यांची पर्स लंपास केली. डाबकी रोडवरील गुरुदेवनगरात राहणार्‍या अलका सुरेंद्र मोरे (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कार्ला येथे लग्नकार्यात जाण्यासाठी त्या त्यांची आई शोभा पुंडकर यांच्यासोबत नवीन बसस्थानकावर आल्या. बसस्थानकावरील अकोला ते परतवाडा एसटी बसमध्ये त्या चढल्या. बसगाडीमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी असल्याने, त्यांच्या खांद्यांवर लटकवलेली पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. एसटी बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पर्स दिसून आली नाही. त्यांनी बसगाडीमध्ये पर्स शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु पर्स मिळून आली नाही. अखेर त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार नोंदविली. चोरट्याने लंपास केलेल्या पर्समध्ये सोन्याचा गोफ, सोन्याचे मणी, दोन अंगठी, गळय़ातील लॉकेट असे एकूण ३७ हजार ६00 रुपये किमतीचे दागिने होते. सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला.

बसस्थानकावर चोरट्यांची टोळी सक्रिय
नवीन बसस्थानकावर चोरटे, खिसेकापूंची टोळीच सक्रिय झाली असून, दररोज बसगाडीमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे मोबाइल, पाकिटे, पर्स लंपास केल्याच्या घटना घडत आहेत. याठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात असूनही सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बसस्थानकावर तैनात पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: Woman jewelery wallets from ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.