स्टोव्हच्या भडक्याने महिला भाजली

By admin | Published: May 20, 2014 06:49 PM2014-05-20T18:49:00+5:302014-05-20T19:16:14+5:30

स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका झाल्यामुळे महिला गंभीररीत्या भाजल्याची घटना शहरातील रामनगर भागात घडली आहे.

The woman roasted with stove | स्टोव्हच्या भडक्याने महिला भाजली

स्टोव्हच्या भडक्याने महिला भाजली

Next

तेल्हारा: स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका झाल्यामुळे महिला गंभीररीत्या भाजल्याची घटना शहरातील रामनगर भागात घडली आहे. सदर महिलेला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तेल्हारा शहरातील रामनगर भागात राहणार्‍या अर्चना विठ्ठल चोपडे (४०) या घरात स्टोव्हवर स्वयंपाक करीत होत्या. त्याच वेळी अचानकपणे स्टोव्हचा मोठा भडका झाला. त्यामुळे अर्चना चोपडे यांच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यांनी आरडाओरड के ल्यामुळे शेजारच्या लोकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांच्या कपड्यांना लागलेली आग विझविली; परंतु या घटनेत अर्चना चोपडे ७० टक्के भाजल्या. त्यांना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: The woman roasted with stove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.