महिला म्हणाल्या आमच्या अंगावरून जेसीबी चालवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:59+5:302021-01-08T04:54:59+5:30
काैलखेडस्थित प्रभाग क्रमांक १९ मधील न्यू खेतान नगर परिसरात मुख्य नाल्याचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे परिसरातील प्राजक्ता कन्या शाळेमागे ...
काैलखेडस्थित प्रभाग क्रमांक १९ मधील न्यू खेतान नगर परिसरात मुख्य नाल्याचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे परिसरातील प्राजक्ता कन्या शाळेमागे राहणाऱ्या रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाण सांडपाण्यामुळे स्थानिकांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला असून, सबमर्सिबल पंप, हातपंपाचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे महिला वर्गांत मनपा प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तुंबलेल्या नाल्याची साफसफाई करण्यासाठी मनपातील सभागृहनेत्या तथा प्रभागातील नगरसेविका याेगिता पावसाळे यांनी प्रशासनाला वारंवार सूचना केली आहे. तरीही मनपाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची परिस्थिती आहे. अशा स्थितीमध्ये सांडपाणी तुंबलेल्या नाल्याची दिशा बदलून ताे परिसरातील काही महिलांच्या घरासमाेरून तसेच लेआउटमधून खाेदण्याच्या कामाला अचानक साेमवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. त्यासाठी स्थानिक राजकीय नेत्याने पुढाकार घेतल्यामुळे काही काळ स्थानिक रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता; परंतु नाल्याची दिशा न बदलण्याच्या मुद्यावरून महिला ठाम असल्याचे दिसून आले. पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदवला तरी चालेल, अंगावरून जेसीबी चालवला तरीही मागे हटणार नसल्याची भूमिका घेत असंख्य महिलांनी जेसीबीसमाेरच ठिय्या दिला. महिलांची रास्त भूमिका पाहता बंदाेबस्तासाठी आलेल्या पाेलिसांनी, जेसीबी चालकांनी माघार घेणे पसंत केले. यावेळी छाया देशमुख, सुरेखा बेलाेकार, सुनीता गणेश राऊत, राधिका साबळे, मुक्ता मानकर, सुनीता पिसे, स्नेहा राठाेड, सुशिला भगत, शीतल सावळे, मनाेरमा मसने, छाया इंगळे, मनाेरमा बायस्कर, अनिता दीक्षित, अलका डाहाके, ज्याेती येवतकर, अलका ताले, मंदा श्रीनाथ, कांचन दहात्रे यांसह असंख्य महिला व पुरुष उपस्थित हाेते.