महिलेची ग्रामविकास अधिका-यास मारहाण
By admin | Published: August 10, 2016 01:08 AM2016-08-10T01:08:09+5:302016-08-10T01:08:09+5:30
अकोला जिल्हा परिषदेतील घटना.
अकोला , दि. 0९ : संस्थेसाठी खुली जागा मिळण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले नसल्याने संतापलेल्या एका महिलेने मंगळवारी जिल्हा परिषद पंचायत विभागाला कुलूप ठोकल्यानंतर ग्राम विकास अधिकार्यास मारहाण केली. या घटनेने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
भारती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव भारती निम यांनी संस्थेसाठी खरप बु. भागातील ई-क्लास खुली जागा मिळण्याबाबत प्रस्तावाच्या मंजुरीकरिता जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्याबाबत अर्ज केला होता; परंतु जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत एनओसी मिळाली नसल्याने, संतापलेल्या भारती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव भारती निम यांनी मंगळवारी दुपारी १२.३0 वाजताच्या जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
अध्र्या तासानंतर कुलूप उघडल्यानंतर भारती निम पंचायत विभागाच्या कार्यालयात आल्या. जागेच्या ह्यएनओसीह्णबाबत ग्राम विकास अधिकारी मनोज बोपटे यांना त्यांनी विचारणा केली केली. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी बोपटे यांनी त्यांना पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांना भेटण्यास सांगितले असता, संतापलेल्या भारती निम यांनी ग्राम विकास अधिकारी मनोज बोपटे यांना शिवीगाळ करीत, मारहाण केली.
कार्यालयात उपस्थित कर्मचारी तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी विलास खिल्लारे यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद पंचायत विभागातील एका ग्राम विकास अधिकार्याने महिलेने मारहाण केल्याच्या घटनेने जिल्हा परिषद वतरुळात एकच खळबळ उडाली होती.