सर्पदंश झाल्याने महिला गंभीर, तर गाय दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:50+5:302021-08-22T04:22:50+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील सावरगाव येथे सर्पदंश झाल्याने शीतल योगेश हरमकार (२०) गंभीर झाल्या, तर राजेश श्रीराम नागलकर यांच्या ...

The woman was bitten by a snake and the cow was bitten | सर्पदंश झाल्याने महिला गंभीर, तर गाय दगावली

सर्पदंश झाल्याने महिला गंभीर, तर गाय दगावली

Next

खेट्री : पातूर तालुक्यातील सावरगाव येथे सर्पदंश झाल्याने शीतल योगेश हरमकार (२०) गंभीर झाल्या, तर राजेश श्रीराम नागलकर यांच्या गायीला सर्पदंश झाल्याने दगावल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. शीतल हरमकार घरात असताना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांना सर्प चावल्याने त्या गंभीर झाल्या आहेत. त्यांना मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले. तसेच शुक्रवारी सायंकाळी राजेश नागलकर यांच्या गायीला साप चावल्याने गाय दगावल्याने २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी वाहळा येथे १३ ऑगस्ट रोजीच्या रात्री सर्पदंश झालेल्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. सापाच्या भीतीमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: The woman was bitten by a snake and the cow was bitten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.