अकोल्यातील महिलांना पुरुषांपेक्षा जास्त टेन्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:21+5:302020-12-26T04:15:21+5:30
रक्तदाबाचे प्रमाण (टक्क्यांत) महिला - पुरुष सौम्य रक्तदाब - ११.७ ...
रक्तदाबाचे प्रमाण (टक्क्यांत)
महिला - पुरुष
सौम्य रक्तदाब - ११.७ - १२.६
गंभीर रक्तदाब - ४.२ - ४.२
तीव्र रक्तदाब - १९.१ - १९.४
रक्तदाब वाढण्याचे कारण
अनेकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या ही अनुवांशिक असू शकते. त्याच सोबत मद्यपान, मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करणे, जेवण करून आराम करणाऱ्या किंवा एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण ७८ टक्के आहे.
काय काळजी घ्यावी?
उच्च रक्तदाब होऊ नये किंवा तो नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलीत आहार घेणे आवश्यक आहे, तसेच योग्य वजन कायम ठेवणे, वाढलेले वजन घटविणे, नियमित व्यायाम, योगा करणे, मीठ खाण्याचे प्रमाण कमी करणे आदींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी नियमित संतुलीत आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. हेल्थ इन्डेक्सनुसार, वजन नियंत्रित ठेवल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला.