रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:45 AM2020-12-26T11:45:26+5:302020-12-26T11:47:52+5:30

High blood pressure : मागील पाच वर्षात महिलांमध्ये तीव्र रक्तदाबाचे प्रमाण १८.१ टक्क्यांनी वाढले आहे.

Women are more likely than men to have high blood pressure | रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त

रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त

Next
ठळक मुद्देधक्कादायक माहिती राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे. जिल्ह्यातील १९.१ टक्के पुरुषांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे.महिलांमध्ये हे प्रमाण १९.४ टक्के आहे.

अकोला: मागील पाच वर्षात रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात तीव्र रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे नुकताच राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये तीव्र रक्तदाबाचे प्रमाण जास्त आहे. २०१९-२० च्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील १९.१ टक्के पुरुषांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, तर महिलांमध्ये हे प्रमाण १९.४ टक्के आहे. मागील पाच वर्षात महिलांमध्ये तीव्र रक्तदाबाचे प्रमाण १८.१ टक्क्यांनी वाढले आहे.

रक्तदाबाचे प्रमाण (टक्क्यांत)

                         महिला - पुरुष

सौम्य रक्तदाब - ११.७ - १२.६

गंभीर रक्तदाब - ४.२ - ४.२

तीव्र रक्तदाब - १९.१ - १९.४

रक्तदाब वाढण्याचे कारण

अनेकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या ही अनुवांशिक असू शकते. त्याच सोबत मद्यपान, मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करणे, जेवण करून आराम करणाऱ्या किंवा एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण ७८ टक्के आहे.

 

काय काळजी घ्यावी?

उच्च रक्तदाब होऊ नये किंवा तो नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलीत आहार घेणे आवश्यक आहे, तसेच योग्य वजन कायम ठेवणे, वाढलेले वजन घटविणे, नियमित व्यायाम, योगा करणे, मीठ खाण्याचे प्रमाण कमी करणे आदींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी नियमित संतुलीत आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. हेल्थ इन्डेक्सनुसार, वजन नियंत्रित ठेवल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला.

Web Title: Women are more likely than men to have high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.