काेराेना लसीकरणाची जबाबदारी महिलांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:19 AM2021-03-08T04:19:17+5:302021-03-08T04:19:17+5:30
पातुर : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाची भीती व्यक्त हाेत असताना ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या काेराेना लसीकरणाची जबाबदारी ...
पातुर : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाची भीती व्यक्त हाेत असताना ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या काेराेना लसीकरणाची जबाबदारी पातूर प्राथमिक आराेग्य केंद्रात महिलाच पार पाडत आहेत.
काेराेना विषाणुचा पातूर तालुक्यात शिरकाव झाल्यापासून पातूर प्राथमिक आरोग्य केंद्राने दक्षता घेत नागरिकांच्या आराेग्यासाठी उपाययाेजना आखल्या. नागरिकांमध्ये जागृती करून त्यांना काेराेना प्रतिबंधासाठी जागरुक केले. काेराेना लस आल्यानंतर लसीकरणाची माेहिम सुरू झाली. चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून काेराेना लसीची चाेरी झाल्यानंतर लसीकरण माेहीम चतारी येथून पातूर प्राथमिक आराेग्य केंद्रा सुरू करण्यात आली. त्यामुळे अधिकच जबाबदारी येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाढली त्यामुळे पातुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव, वैद्यकीय अधिकारी चिराग रेवाळे, वैद्यकीय अधिकारी कैलास डाखोरे यांच्या मार्गदर्शनात पातूर आराेग्य केंद्रात रेखा देविदास सपकाळ यांच्यासह, सोनल शिरसाट, हर्षा खडसे शुभांगी नगराळे ,जयश्री बोळे , पौर्णिमा कडू आणि दीपा तायडे ह्या काेराेना लसीकरणाची जबाबदारी पार पाडत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्तांसाेबत थेट संबंध येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
...........
कोरोना काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, त्याबरोबरच वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडणे, यामुळे शेजारी जरा लांबूनच विचारपुस करीत आहेत. त्याबरोबरच कुटुंबातही वावरताना स्वतःच्या मुलापासून कुटुंबापासून अनेकदा दूर राहावे लागत आहे. याची मनामध्ये खंत आहे, मात्र जनजागृती करताना लोकांना कोरोना पासून दूर ठेवण्याचा समाधान लाभलं आहे.
रेखा देविदास सपकाळ -वैराळे, नर्स