महिलांनी ग्रामसेवक व बिडीओच्या दिशेने फेकल्या बांगड्या !
By admin | Published: January 11, 2017 07:54 PM2017-01-11T19:54:09+5:302017-01-11T19:54:09+5:30
वारंवार मागणी करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे पाहून एकांबा येथील महिलांनी ग्रामसेवक व गटविकास अधिका-यांच्या दिशेने बांगड्या फेकून संतापाला वाट मोकळी करून दिली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मालेगाव (वाशिम), दि. 11- वारंवार मागणी करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे पाहून एकांबा येथील महिलांनी ग्रामसेवक व गटविकास अधिका-यांच्या दिशेने बांगड्या फेकून संतापाला वाट मोकळी करून दिली. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सभेत मालेगाव पंचायत समिती येथे बुधवारी घडला.
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी बुधवारी मालेगाव पंचायत समिती येथे ग्रामसेवकांची आढावा सभा बोलाविली होती. ही सभा सुरू झाल्यानंतर एकांबा येथील महिला सभेत आल्या आणि एकांबा येथील पाणीटंचाईसंदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्या, याचा जाब विचारू लागल्या. पाणीटंचाईला सामोरे जाणाºया महिलांनी या सभेत प्रश्नांची सरबत्ती करून आक्रमक रुप धारण केले. गटविकास अधिकारी महागावकर व ग्रामसेवक नंदकिशोर काकडे यांच्याकडे अर्ज देवून त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पाणीटंचाई प्रश्नावर आजच निर्णय घ्या, या प्रश्नावर महिला ठाम राहिल्याने शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी गावातील विहिर अधिग्रहित करण्याचे आश्वास दिले. त्यामुळे महिला व ग्रामस्थ शांत झाले आणि या घटनाक्रमावर पडदा पडला.