महिलेस मारहाण; सहा महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 01:31 AM2017-04-07T01:31:48+5:302017-04-07T01:31:48+5:30
पातूर- घरात घुसून मारहाण करणाऱ्या पाच जणांना पातूर न्यायालयाने ६ एप्रिल रोजी सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकी सात हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
पातूर : तालुक्यातील खानापूर येथील महिलेस गैरकायदेशीर मंडळी जमवून घरात घुसून मारहाण करणाऱ्या पाच जणांना पातूर न्यायालयाने ६ एप्रिल रोजी सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकी सात हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
खानापूर येथील नंदा प्रमोद सिरसाट यांना गावातीलच पाच जणांनी २० सप्टेंबर २००८ रोजी गैरकायदेशीर मंडळी जमवून घरात घुसून मारहाण केली होती. या प्रकरणी नंदा सिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी उमेश मोहन सिरसाट, देवानंद तुळशीराम सिरसाट, रामभाऊ पंढरी सिरसाट, कै लास विठोबा सिरसाट, बाळू उदेभान सिरसाट सर्व रा.खानापूर यांच्यविरुद्ध कलम ४५२, १४३,१४७, १४७, ३२४, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात वर्ग केले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पाचही आरोपींना दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकाला सात हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एका महिन्यांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. गोपाल गव्हाळे यांनी, तर आरोपींकडून अॅड. किरण सदार यांनी काम पाहिले.