मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची महिला कर्मचारी पटविणार ओळख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:58 PM2019-04-14T12:58:26+5:302019-04-14T12:58:30+5:30
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची महिला कर्मचाऱ्यांकडून ओळख पटविण्यात येणार आहे.
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची महिला कर्मचाऱ्यांकडून ओळख पटविण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील महिला कर्मचाºयांना ओळख पटविण्याचे प्रशिक्षण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देण्यात आले.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ११ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ज्या मतदान केंद्रांतर्गत मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे, अशा मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांच्या पथकासोबत बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला कर्मचारी राहणार आहेत. त्यामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मुस्लीमबहुल ६९ मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी ६९ शिक्षिकांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित शिक्षिकांना १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे यांनी संबंधित शिक्षिकांना मार्गदर्शन केले.