वृक्ष वाचविण्याकरीता महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 01:39 PM2017-07-17T13:39:07+5:302017-07-17T13:39:07+5:30

वनकायदानुसार कारवाई करा ही प्रमुख मागणी करीत सकाळी घरातील हातचे कामे सोडुन रणरागिणी महीला नगरपरिषद कार्यालयावर धडकल्या.

Women gathering for saving trees | वृक्ष वाचविण्याकरीता महिला एकवटल्या

वृक्ष वाचविण्याकरीता महिला एकवटल्या

Next

आकोट नगर परिषदवर धडकल्या रणरागिणी
विजय शिंदे
आकोट:आकोट उपविभागिय अधिकारी(महसुल) यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षतोड करणारे रानकसाईवर वनकायदानुसार कारवाई करा ही प्रमुख मागणी करीत सकाळी घरातील हातचे कामे सोडुन रणरागिणी महीला नगरपरिषद कार्यालयावर धडकल्या.केवळ वटपोर्णिमाची पुजा करीत वडाला धागे न बांधता हिरवेगार सर्वच
वृक्ष वाचविण्याकरीता ह्या महीला एकत्र आल्या. दारूबंदीकरीता लढा उभारण्याकरीता महीला एकवटले आहेत. पंरतु वृक्ष वाचविण्याकरीता महीलां एकवटल्याची बहुद्या ही पहीलीच घटना आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आकोट यांचे अख्यारीत एसडीओचे निवासस्थान आहे. या परिसरातील 8 हिरवेगार झाडाची अवैधपणे कटाई करण्यात आली. सा.बा. विभागाने तीन वाळलेल्या झाडाचा लिलाव केला. पंरतु प्रत्यक्षात नगरपरिषदची परवानगी नसलेली मोठमोठी हिरवी झाडे कापली आहेत. तसेच नरसिंग रोडवरील नझुलचे जागेमधील हिरवेगार झाड तोडले असतांना आम्ही पोहचल्याने कटाई करणारा पळुन गेला आहे.या अवैधपणे वृक्ष कटाई प्रकरणाची चौकशी करून संबधीतावर वनकायदानुसार कारवाई करण्याची मागणी वृक्ष लागवड समितीचे अध्यक्षा शोभाताई बोडखे, अर्पणा चिखले,चंचल पिताबंवाले, शोभना भांडे, रूचा ठाकुर, कविता राठोर, दिपाली केवटी राधिका देशपांडे ,मिनाक्षी आडे,मजुषा बोडखे यांचेसह महीलांनी केली. यावेळी मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्षा व सचीव गीता ठाकरे यांनी महीलांचे म्हणणे ऐकुन घेत निवेदन स्विकारले. यावेळी महीलांनी आम्ही झाडे लावतो. शासनसुध्दा चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राबवित आहे. पंरतु खुलेआम वृक्षकटाईमुळे शासनाची बदनामी होत हरताळ फासली जात आहे.
त्या दोंघीनी वाचवले झाड
आकोट एसडीओ बंगलातील अवैध वृक्ष कटाईचे प्रकरण लोकमतने चव्हाट्यावर आणल्यिनंतर समाजात वृक्ष वाचविण्याकरीता जनजागृती व धडपळ सुरू झाली आहे. आज नरसिंग रोडवर नझुल जागेतील एक हिरवे झाड कटाईची माहीती वृक्ष लागवड समितीचे चंचल पिताबंरवाले व अर्पणाताई चिखले यांना मिळताच ह्या दोंघी तिथं धावुन गेल्या. झाड तोडत असतांनाच परवानगी मागताच वृक्षतोडणाराने पोबारा केला. त्यामुळे पुर्ण झाड आज तरी वाचले.कदाचित ह्या दोघी गेल्या नसत्या तर एक झाड कटले असते. महीलामुळे झाड वाचविण्याचा प्रेरणादायी संदेश समाजात गेला. पंरतु विविध कारणे देत वृक्ष तोडणे सुरू आहे. अधिकारी त्वरीत कारवाई करत नसल्याने वृक्ष तोडणाराचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे फोटो सेशनकरीत झाड लावायचे तरी कशाकरीता असा प्रश्न भेडसावत असल्याने वृक्ष वाचविण्याकरीता लागवडी प्रमाणे सर्वानी एकवटने गरजेच झाले आहे.

Web Title: Women gathering for saving trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.