मूर्तिजापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:39+5:302021-02-10T04:18:39+5:30

८६ पैकी ४४ ग्रामपंचायत महिला सरपंचपदासाठी राखीव आहेत. २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ...

Women manage 13 gram panchayats in Murtijapur taluka | मूर्तिजापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

मूर्तिजापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

Next

८६ पैकी ४४ ग्रामपंचायत महिला सरपंचपदासाठी राखीव आहेत. २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १५ जानेवारी रोजी २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. ९ फेब्रुवारी रोजी पारद, भटोरी, मंगरुळ कांबे, गोरेगाव, सिरसो, लाखपुरी, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा, हिरपूर, कवठा (खोलापुर), सोनोरी (बपोरी), कुरूम आणि माटोडा या १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात पारद सरपंचपदी विनोद नारायण मानकर, उपसरपंचपदी चंदा नाजूकराव खंडारे, भटोरीच्या सरपंचपदी छबूताई भाऊराव मुरळ, उपसरपंचपदी वर्षा रवींद्र घोंगडे, मंगरूळ कांबे सरपंचपदी सुभाष श्यामराव वाकोडे, उपसरपंचपदी अभय मधुकरराव कांबे, गोरेगावच्या सरपंचपदी यशोदा देवानंद सरदार, उपसरपंच शेख निकत अंजूम फयाजोद्दीन, सिरसोच्या सरपंचपदी जय महादेवराव तायडे, उपसरपंच वनिता अनंत दाभाडे, लाखपुरीच्या सरपंचपदी अजय जयदेवराव तायडे, उपसरपंचपदी राजप्रसाद हरप्रसाद कैथवास, दुर्गवाडा सरपंचपदी संतोष रामराम गवई, उपसरपंच चित्रा सतीश पंडित, सांगवीच्या सरपंचपदी अर्चना दिलीप खोकले, उपसरपंच प्रशांत सुरेशराव खांडेकर, टिपटाळा सरपंचपदी जयश्री सुनील डोंगरे, उपसरपंच प्रियंका अमोल गावंडे, हिरपूर सरपंचपदी अमोल छत्रपती गडवे, उपसरपंच काजोल रवीकुमार शिंदे, कवठा (खोलापूर) सरपंचपदी आरती प्रफुलराव देशमुख, उपसरपंच अरुणा गोवर्धन डोंगरदिवे, सोनोरी (बपोरी) सरपंचपदी किरण नितीन काळे, उपसरपंच गोपाळ रामजी चुडे, कुरुम सरपंचपदी अतुल दादाराव वाठ, उपसरपंच इम्रान खान साजीद खान, माटोडा सरपंचपदी जिजाबाई सुखदेव खंडारे, उपसरपंच रामराम बाबूजी मेश्राम यांची निवड झाली.

येथे झाली सरपंच, उपसरपंचांची बिनविरोध निवड

पारद, भटोरी, गोरेगाव, टिपटाळा

सोनोरी (बपोरी), कुरुम,

सिरसो ग्रामपंचायतचे भवितव्य अधांतरी

सिरसो येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सदस्यांनी आम्ही अनुसूचित जमातीमध्ये येत असून, त्यांनी सरपंच पदावर दावा करून सरपंचपदासाठी अर्ज सादर केले; परंतु निवडणूक प्रक्रियेदरम्यान जातपडताळणी प्रमाणपत्र कोणाकडेच नसल्याने त्यांना एका वर्षात प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी देण्यात आला. तूर्त सरपंचपदाची माळ जय महादेवराव तायडे यांच्या गळ्यात पडली. त्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. निवडणूक प्रक्रियेत १३ पैकी ७ सदस्यांनी जय महादेवराव तायडे यांना मतदान केले. सुभाष कृष्णराव खरतडकर यांना ६ मते पडली.

Web Title: Women manage 13 gram panchayats in Murtijapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.