गाेडे पाणी द्या, खारपाणपट्यातील महिलांचा घागर माेर्चा

By राजेश शेगोकार | Published: April 24, 2023 06:00 PM2023-04-24T18:00:29+5:302023-04-24T18:00:39+5:30

गाेडे पाणी द्या या मागणीसाठी खारपाणपट्यातील महिलांनी आंदोलन केले. 

  women of the saline area protested for the demand of giving water to the horses  | गाेडे पाणी द्या, खारपाणपट्यातील महिलांचा घागर माेर्चा

गाेडे पाणी द्या, खारपाणपट्यातील महिलांचा घागर माेर्चा

googlenewsNext

अकाेला : अकाेला जिल्ह्यातील खारपाणपटयात येणाऱ्या गांधीग्राम येथे गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा ठप्प आहे त्यामुळे या ग्रामस्थांना पुर्णा नदीतील दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या महिलांनी साेमवारी जिल्हा परिषदेसमाेर घागर माेर्चा आणला. आम्हाला शुद्ध गाेडे पाणी द्या अशी मागणी करत महिलांनी पाण्यासाठी आक्राेश केला. गांधीग्रामला खांबाेरा पाणीपुरवठा याेजनेवरून पाणीपुरवठा केला जाताे.

 हे गाव या याेजनेतील शेवटचे गाव असल्याने आधीच सात आठ दिवसाआड पाणी मिळते मात्र गेल्या महिन्याभरापासून पाण्याचा पुरवठाच झालेला नाही.त्यामुळे या ग्रामस्थांना थेट पुर्णेच्या पात्रातून पाणी पिण्यासाठी आणावे लागते. हे पाणी दुषीत असल्याने अनेकांना पाेटाचे आजार झाल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. हवे तर आठ दिवसातून एकदा पाणी द्या पण गाेडे व शुद्ध् पाणी पुरवठा करा अशी विनंती महिलांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली.

 

Web Title:   women of the saline area protested for the demand of giving water to the horses 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला