आव्हानांवर मात करून महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले पाहिजे - प्रतीक्षा तेजनकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:51 PM2020-03-07T18:51:30+5:302020-03-07T18:52:03+5:30
अन्न धान्य वितरण अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.
- संतोष येलकर
अकोला : प्रशासनात काम करताना महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो; मात्र त्यामुळे खचून न जाता येणाºया आव्हानांवर मात करून महिला अधिकारी व कर्मचाºयांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत अकोल्याच्या अन्न धान्य वितरण अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.
महिला अधिकारी व कर्मचाºयांना काम करताना अडचणी येतात का?
-होय, प्रशासनात महिला अधिकारी व कर्मचारी म्हणून काम करताना अनेक अडचणी येत असतात, तसेच वेगवेगळ्या आव्हानांचा सामनाही करावा लागतो; परंतु आव्हानांच्या परिस्थितीत येणाºया अनुभवातून शिकत गेल्यास कर्तव्य बजावण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे येणाºया अडचणी व आव्हानांना सामोरे जाऊन महिला अधिकारी व कर्मचाºयांनी खंबीरपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे.
महिला कर्मचाºयांना सांभाळाव्या लागणाºया जबाबदारीचे स्वरूप कसे आहे?
-महिला अधिकारी आणि कर्मचाºयांना कौटुुंबिक आणि कार्यालयात काम करण्याची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते. घरात मुला-बाळांची काळजी घेण्यासह महिला अधिकारी-कर्मचारी कार्यालयात मनापासून काम करतात. कार्यालयीन वेळेत महिला अधिकारी -कर्मचारी कार्यालयाबाहेर जात नसल्याने, त्यांच्याकडून होणारे कार्यालयीन कामकाजाचे प्रमाणही जास्त असते. तसेच काम करताना महिला-अधिकारी कर्मचाºयांकडून टाळाटाळ होत नाही. लहान मुलांचे संगोपन आणि कार्यालयीन कामाची जबाबदारी पार पाडताना कमालीची ओढाताण होते. त्यामुळे केंद्राच्या धर्तीवर राज्यात महिला अधिकारी व कर्मचाºयांना प्रसूती व बालसंगोपनाची रजा मिळाली पाहिजे.
प्रशासनातील महिलांचा टक्का वाढत आहे का?
-प्रशासनातील महिला अधिकारी व कर्मचाºयांचा टक्का कमी असला तरी, वाढत आहे. कौटुंबिक जबाबदारी आणि प्रशासनात काम करताना येणाºया आव्हानांमुळे काही ठिकाणी काम करण्याची जबाबदारी स्वीकारणे काही प्रमाणात टाळले जाते. त्यामुळे आव्हानांचा सामना करून खंबीरपणे काम करण्याची तयारी केल्यास प्रशासनातील महिला अधिकारी व कर्मचाºयांचा टक्का वाढणार आहे.
भविष्यातील आपले ‘व्हिजन’ काय?
- शेतकरी, गरीब आणि उपेक्षित घटकांच्या अडचणी सोडविण्याची गरज आहे, तसेच आई-वडिलांचे छत्र नसलेल्या अनाथ मुला-मुलींचा शोध घेऊन, त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने भविष्यात प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे.