रामनगर-खापरखेडा येथील महिलांची पाणीटंचाई निवारणार्थ बीडीओ कार्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:20 AM2021-04-20T04:20:07+5:302021-04-20T04:20:07+5:30
तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रामनगर-खापरखेडा येथील महिलांनी चार दिवसांपूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी पातूर पंचायत समितीच्या आवारात ...
तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील शेकापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रामनगर-खापरखेडा येथील महिलांनी चार दिवसांपूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी पातूर पंचायत समितीच्या आवारात पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला घेराव घालून आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही प्यायचे पाणी मिळाले नाही. आंदोलन केले म्हणून शेजारील शेतकऱ्यांनी शेतातील पाणी देण्यासही नकार दिला. पुन्हा सोमवारी गजानन महाराज वानखेडे आणि ज्योती दाभाडे यांच्या नेतृत्वात उषा राठोड, विकास सदाशिव राठोड, यशोदा हरिभाऊ आडे, इंदू बाळू पवार, अमिता काशीराम राठोड आदी महिलांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी ओ.टी. गाठेकर यांच्या दालनात पाण्याची समस्या मांडली. महिलांनी रामनगर-खापरखेडा येथील नागरिकांना पाणी द्या, त्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. शिर्ला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील फाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अर्जुन टप्पे आणि देवानंद गहिले यांनी समजूत घातली. तासभर कलहानंतर आलेगाव-नवेगाव ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता मिलिंद जाधव यांना निर्देश दिले.
फोटो :