प्राथमिक आरोग्य केंद्राची धुरा महिलांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:48+5:302021-03-08T04:18:48+5:30
वाडेगाव: आरोग्य सेवा म्हटलं की, पुरुष डॉक्टर असेलच याच दृष्टीने पाहिल्या जाते. परंतु बाळापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ...
वाडेगाव: आरोग्य सेवा म्हटलं की, पुरुष डॉक्टर असेलच याच दृष्टीने पाहिल्या जाते. परंतु बाळापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्याची वैद्यकीय अधिकारी महिला संभाळत असून, सोबत वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची धुरा सुद्धा मागील दोन वर्षांपासून दोनच महिला संभाळत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची धुरा दोन्ही महिला संभाळत असून, सोबत असलेल्या नर्सही रुग्णसेवा देत आहेत. येथील तालुका वैद्यकीय अधिकारी हाडोळे यांच्या मार्गदर्शनात घुगे, मसने या महिला डॉक्टर कार्यरत आहेत. कोरोनाचा कार्यकाळ म्हणा किंवा दिवस रात्र आरोग्य सेवा ही करीत असल्याचे चित्र आहे. यामध्ये स्टाफ नर्स असलेल्या एस व्ही राठोड, आरोग्य सेविका म्हणून ए पी इंगळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही महिलांना रात्री किंवा दिवसा गरोदर महिला येवो की साधारण रुग्ण येवो हे २४ तास सेवा देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच परिसरातील महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. प्राथमिक आराेग्य केंद्रात सर्वच महिला कारभार सांभाळत असल्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.
....................
तुलंगा उपकेंद्राचे कामकाज महिलांकडेच
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या उपकेंद्र तुलंगा येथील आरोग्य विभागाचा कार्यभार बायस्कर, प्रतीक्षा दवंडे या आराेग्य सेविका सांभाळतात. तसेच सस्ती मुख्यालयात शीतल ढगे काम सांभाळतात. सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश गाडगे यांच्या मार्गदर्शनात एकूण ९ आरोग्य सेविका कारभार सांभाळत असून ,उपकेंद्र असलेल्या तुलंगा बु येथील आरोग्य सेविका के. एस. बायस्कर, सोबत पी एस दवंडे यांच्याकडे तुलंगा बु ,तुलंगा खुर्द,,दिग्रस बु, सांगोळा, लावखेड, निमखेड असे सहा गावातील एकूण ७००० हजार लोकसंख्या गावांमध्ये सेवा दिली जात आहे. या सेवेमध्ये कोविड कॅम्प संभाळणे ,होम क्वांरन्टीन असलेल्या रुग्णास घरी जाऊन योग्य मार्गदर्शन करीत होते. या कोरोना काळातील रुग्ण सांभाळून गरोदर महिलांचे उपक्रम, लस, शासनाकडून असेलेल्या सुविधांबाबत माहिती देऊन वेळोवेळी मार्गदर्शन करतात.