विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांचा आदर्श ठेवावा!
By admin | Published: March 6, 2017 02:12 AM2017-03-06T02:12:29+5:302017-03-06T02:12:29+5:30
‘अभाविप’ची विद्यार्थिनी संसदेत संजय पाचपोर यांचे प्रतिपादन.
अकोला, दि. ५- भारत देशाच्या जडणघडणीत इतिहासातील कर्तृत्ववान महिलांचे मोठे योगदान राहिले आहे. आजच्या विद्यार्थिनींनी राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, पन्ना दायी, अहल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद यांच्या आई भुवनेश्वरी देवी यांचे चरित्र वाचून त्यांचा आदर्श डोळय़ापुढे ठेवला पाहिजे व त्यानुसार करिअरची निवड केली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे क्षेत्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी रविवारी येथे केले.
अभाविप, अकोला यांच्यावतीने येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात रविवारी आयोजित जिल्हास्तरीय विद्यार्थिनी संसदेच्या समारोपीय सोहळय़ाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. पंदेकृविचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले, अभाविपचे प्रा. नितीन गुप्ता, पायल फोकमारे उपस्थित होते. संजय पाचपोर पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात विद्यार्थिनींना करिअर घडविण्याची चिंता असते. करिअर घडवायचे असेल, तर या विद्यार्थिनींनी राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ, अहल्याबाई होळकर, भुवनेश्वरी देवी, पन्ना दायी यांचे चरित्र वाचले पाहिजे. या कर्तृत्ववान महिलांनी स्वत:चे कुटुंबासोबतच राष्ट्राच्या जडणघडीतही मोठी भूमिका बजावली आहे. केवळ पैसा म्हणजे करिअर नाही. ह्यमी समाजाचा, समाज माझाह्ण या उक्तीप्रमाणे शिक्षण घेऊन देशाची व समाजाची सेवा करावी, असेही पाचपोर म्हणाले. समारोपीय सत्राचे संचालन कोमल वाघमारे, स्नेहा बोंडे यांनी, तर आभार संपदा सोनटक्के यांनी मानले. अनिकेत खंडारे यांच्या ह्यवंदे मातरम्ह्णने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. तत्पूर्वी, सकाळी ११ वाजता अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांच्या हस्ते विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर डॉ. विलास भाले, प्रा. डॉ. राजीव बोरकर, हर्षल अलकरी, महेश चेके उपस्थित होते. नंतरच्या सत्रात अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, अधिवक्ता मनीषा कुलकर्णी, डॉ. बागडी, सुभाष गवई, मंजूषा खर्चे यांचे विविध विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे झाली. या विद्यार्थिनी संसदेला जिल्हाभरातून आलेल्या शेकडो विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यांचा झाला छात्र सन्मान
समारोपीय सत्रात वैद्यकीय परीक्षेत सुवर्णपदक विजेती डॉ. ऋतुजा मायी, एनसीसी कॅडेट तेजस्विता बडगुजर, व्हाइस ऑफ इंडियातील सहभागी रसिका बोरकर, कुस्तीपटू निकीता अंबुसकर या विद्यार्थिनी व क्षितीय दिव्यांग विरंगुळा व पुनर्वसन केंद्राच्या मंजुश्री कुळकर्णी यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यांचे लाभले सहकार्य
कार्यक्रमासाठी संपदा सोनटक्के, सत्यजित आवळे, अक्षय जोशी, विराज वानखेडे, गजानन राऊत, वशिष्ठ कात्रे, पल्लवी घोगरे, ऋषिकेश देवर, श्रीकांत पाटील, सोहम कुलकर्णी, ऋषिकेश अंजनकर, अनंता निंबाळकर, मीनाक्षी सरोदे, जीवन हाके, मोहित कुलकर्णी, सुहास साखरे, पुष्कर देव, चिराग अग्रवाल, आयुष शर्मा, दीपाली आगरकर, दीक्षा राठी, विष्णू अवचार, यश कराळे आदींचे सहकार्य लाभले.